महिला अत्याचारविरोधात चिपळुणात भाजप महिला आघाडीतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 05:53 PM2020-10-12T17:53:16+5:302020-10-12T17:56:01+5:30
महिलांवरील होणाऱ्या अत्याचारविरोधात भाजप चिपळूण महिला आघाडीतर्फे चिंचनाका येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणा देण्यात आल्या.
चिपळूण : महिलांवरील होणाऱ्या अत्याचारविरोधात भाजप चिपळूण महिला आघाडीतर्फे चिंचनाका येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी विरोधात घोषणा देण्यात आल्या.
महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा नीलम गोंधळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महिला अत्याचारविरोधात भाजप महिला आघाडीतर्फे शहरातील चिंचनाका येथे रस्त्यावर आडवे उभे राहून आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे चिंचनाका येथे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
यावेळी उत्तर रत्नागिरी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्मिता जावकर, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेविका रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, माजी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रश्मी कदम, जिल्हा कार्यकारणी सदस्य स्नेहा सुखदरे, मंडणगड महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुशीला पाटील, चिपळूण शहराध्यक्ष अश्विनी ओतारी, मंडणगड शहराध्यक्षा अंजली महाडिक, मालती जाधव, वैभवी चव्हाण, शीतल गोंधळेकर, मानसी कांबळी, अंजली महाडिक, संध्या भालेकर, रोशनी पेवेकर, श्रेया मुरकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रतिज्ञा कांबळी, तालुकाध्यक्ष विनोद भोबसकर, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, उत्तर रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष मालप, सुयश पेठकर उपस्थित होते.