देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे वाडा वेसराड येथे आरंभ या समाजभान असलेल्या सामाजिक ग्रुप तर्फे नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या ग्रुपच्यावतीने पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी वालावकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मेडिकल कॉलेज सावर्डा यांचे सहकार्य लाभले. डॉ प्रताप शेटे आणि रवि अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार नागवेकर, लोकोपायलट अविनाश रहाटे आणि ग्रुपचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. एकूण पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांना हॉस्पिटलतर्फे प्रमाणपत्र आणि कार्ड देण्यात आले.
कार्यकर्ते प्रसाद नागवेकर, प्रियदर्शन नागवेकर, अक्षय भटकर, तेजस नागवेकर, संतोष चौकेकर, राजेश सुर्वे, उमेश सोलकर, प्रियांका नागवेकर राकेश नागवेकर, विजय सोलकर, राजेश सुर्वे, प्रेमनाथ नागवेकर व मंडळातील इतर सभासदांच्या मेहनतीमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.