महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्धाचा आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:21+5:302021-06-02T04:24:21+5:30

लांजा : महिनाभरापूर्वी घरातून बाहेर पडलेल्या बापेरे बौद्धवाडी येथील ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह कुळीत भाटले ते रावारी तेलीवाडीदरम्यान बागेजवळील ...

The body of an old man who went missing a month ago was found | महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्धाचा आढळला मृतदेह

महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्धाचा आढळला मृतदेह

Next

लांजा : महिनाभरापूर्वी घरातून बाहेर पडलेल्या बापेरे बौद्धवाडी येथील ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह कुळीत भाटले ते रावारी तेलीवाडीदरम्यान बागेजवळील पायवाटेवर कुजलेल्या स्थितीत आढळला. विलास तानू जाधव (६०), असे मृत वृद्धाचे नाव आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापेरे बौद्धवाडी येथील विलास तानू जाधव हे दि. २ मे रोजी काेणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडले हाेते. त्यांना दारूचे व्यसन हाेते. दारूच्या नशेत ते घरातून बाहेर पडले की चार ते पाच दिवस घरी येत नसत. लाॅजवर कामाला असल्याने ते कामाला गेल्याचा समज नातेवाइकांनी केला हाेता. बरेच दिवस घरी न आल्याने त्यांचा शाेध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ते कुठेही आढळले नव्हते.

बापेरे गावातील तुळशीराम इंदूलकर हे दि. ३१ मे रोजी सायंकाळी ५़ ३० वाजता कुळीत भाटले ते रावारी तेलीवाडी येथील बागेतून पायवाटेने येत असताना रस्त्याच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. त्यांनी गावचे पोलीस पाटील यांना याची माहिती दिली. मात्र, काळाेख पडल्याने पोलीस पाटलांनी मंगळवारी सकाळी लांजा पोलिसांना याबाबत सांगितले.

लांजाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, प्रथमेश वारीक, चालक राजेंद्र देसाई, होमगार्ड भीमराव धनावडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

मृत्यू झालेल्या विलास जाधव यांच्या अंगावरील कपडे व त्यांच्या पिशवीत असलेले कपडे यावरून त्यांचा मुलगा योगेश विलास जाधव (२९) यांनी हे आपले वडील असल्याचे सांगितले. याबाबत पाेलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: The body of an old man who went missing a month ago was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.