बसफेरी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:31 AM2021-04-01T04:31:37+5:302021-04-01T04:31:37+5:30

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागात पन्हाळजे - खेड - मुंबई बसफेरी बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत ...

Bus ride begins | बसफेरी सुरू

बसफेरी सुरू

googlenewsNext

खेड : तालुक्यातील खाडीपट्टा विभागात पन्हाळजे - खेड - मुंबई बसफेरी बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांच्या मागणीवरून ही बसफेरी पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ही बस दुपारी १२ वाजता पन्हाळजे येथून सुटत असून मुंबईला रात्री १० वाजता पोहोचत आहे.

संगणक कक्षाचे उद्घाटन

खेड : भरणे येथील नवभारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी आमदार संजय कदम यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या संगणक संचाचे व कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी संस्था सचिव अ‍ॅड. टी. एल. डफळे, सहसचिव दत्तात्रय धुमक, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अनिल कदम उपस्थित होते.

उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय कॅडेट क्रॉप्स विभाग व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यावतीने महाविद्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३३ युवकांनी रक्तदान केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील ऊर्फ बंधू मयेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

तक्रारपेटीची तपासणी

आरवली : संगमेश्वर पोलिसांतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महिला व युवती तक्रार पेट्यांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व सायबर गुन्हे याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

शिमगोत्सव रद्द

रत्नागिरी : तालुक्यातील वायंगणी गावातील श्री देव वायंगणेश्वर क्षेत्रपाल देवस्थान मंडळातर्फे दिनांक १ एप्रिल रोजी शिमगोत्सवानिमित्त नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे शासकीय नियमांचे पालन करून उत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान कमिटीतर्फे देण्यात आली.

कीड रोगाचा प्रादुर्भाव

दापोली : कोकण विभागात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी तुरळक पावसामुळे आंबा पिकावर कीड व रोग प्रादुर्भावाची शक्यता आहे. यासाठी बागायतदारांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. आंबा बागांचे वेळोवेळी सर्वेक्षण करुन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

खेड : तालुक्यातील लवेल विभाग शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित कै. पद्यश्री अण्णासाहेब बेहेरे ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीनंतर पुढे काय, या विषयांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन डॉ. अविनाश बेडेकर यांनी भूषविले. लवेल, बोरज, आयनी, लोटे, गुणदे परिसरातील विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.

माती परीक्षण अनुदान

रत्नागिरी : माती परीक्षणाद्वारे पीकस्थिती ठरविण्यासाठी कोकणातील शेतकरी स्वत: माती परीक्षण करुन जमिनीचा पोत सुधारू शकतात. यासाठी शासनाने माती परीक्षणाचे किट अनुदान तत्त्वावर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. ६ ते ७ हजार किमतीच्या किटसाठी २५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.

गलांडे यांची निवड

रत्नागिरी : महात्मा गांधी शिक्षण मंदिर हरचेरी हुमरे प्रशालेतील क्रीडाशिक्षक मारुती गलांडे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्ल विद्येअंतर्गत आयोजित केलेली पंचपरीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. मान्यवरांच्याहस्ते प्रमाणपत्र, ओळखपत्र देऊन गलांडे यांचा गौरव करण्यात आला.

शीतपेयांना मागणी

रत्नागिरी : उकाड्यामुळे शीतपेयांना मागणी होत आहे. विविध कंपन्यांनी छोट्या-मोठ्या आकारात ग्राहकांना परवडेल अशा दरात शीतपेये उपलब्ध केली आहेत. विविध फळांचे सरबत विक्रेत्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत. याशिवाय आईस्क्रिमलाही मागणी होत आहे. कोरोनाचे संकट असतानाही शीतपेयांकडे कल अधिक आहे.

Web Title: Bus ride begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.