रत्नागिरी : शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रभारी प्राचार्य कुलकर्णी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहाचा आणि अफाट वाचनाचा आदर्श घेणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जगातील अनेक देशांनी अनेक पदव्या प्रदान करून गौरविलेले डॉ. आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ठरले. कोणत्याही प्रश्नाला ते अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सामोरे जात असत. त्यांची निरंतर अभ्यास आणि वाचनसंस्कृती आपण यानिमित्ताने पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल किरण धांडोरे यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
.................................
रत्नागिरीतील गाेगटे - जाेगळेकर महाविद्ययालयातील कै. बाबुराव जाेशी ग्रंथालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी प्रभारी प्राचार्य पी. पी. कुलकर्णी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.