असगोली :
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस ॲण्ड पॉवर कंपनीतर्फे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांच्या नेतृत्वाखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांनी सांगितले की, वृक्ष हे ऑक्सिजन निर्मितीचे नैसर्गिक स्राेत असून, वातावरणातील हवा शुद्ध करण्याचे महत्त्वाचे काम करीत असतात. पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच भविष्याचे रक्षण असून, वृक्षलागवड करून वातावरणातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होईल़ कोरोनाशी संघर्ष करत असताना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे; परंतु भविष्यकाळासाठी हे वृक्षच आपल्याला ऑक्सिजन देऊ शकतील.
------------------------
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस ॲण्ड पॉवर कंपनीतर्फे आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात आले़