वडवलीत जागेच्या वादातून कुटुंबांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:38 AM2021-09-17T04:38:21+5:302021-09-17T04:38:21+5:30

राजापूर : जागेच्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीतून वडवली वरचीवाडी येथील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ...

Clash between families over land dispute in Vadavalli | वडवलीत जागेच्या वादातून कुटुंबांमध्ये हाणामारी

वडवलीत जागेच्या वादातून कुटुंबांमध्ये हाणामारी

Next

राजापूर : जागेच्या वादातून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीतून वडवली वरचीवाडी येथील सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.

वंदना हरिश्चंद्र शिंदे (५९) हिने जयराम तुकाराम शिंदे (७०) वगैरे ३ जणांविरोधात फिर्याद दिली आहे. तर जयराम तुकाराम शिंदे यांनी वंदना हरिश्चंद्र शिंदे वगैरे ४ जणांविरोधात फिर्याद दिली आहे. वंदना शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणपती विसर्जन करून घरी परतलो. त्या वेळी आनंद जयराम शिंदे व श्रीकांत आनंद शिंदे हे आपल्या कम्पाउंडचे लोखंडी गेट टिकाव व कुऱ्हाडीने तोडत हाेते. त्यांना विचारणा केली असता आनंद व श्रीकांत यांनी आपणास व आपले कुटुंबास मारहाण केली. तर तुमची घरे जाळून टाकून तुम्हाला ठार मारू, अशी धमकी दिली. तसेच पाण्याच्या मोटारीची केबल कापून नुकसान केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी जयराम शिंदे, आनंद शिंदे व श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जयराम तुकाराम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत आपला मुलगा आनंद हा गोठ्याकडे जाणारी पायवाट साफ करीत हाेता. त्या वेळी त्या ठिकाणी येऊन वंदना शिंदे, पुतण्या रोहित, चुलत भावजय प्रमिला व संध्या यांनी आनंद याची कॉलर पकडून कानाखाली मारली तसेच खिसा फाडून नुकसान केले व शिवीगाळही केली. तर दांडक्याने डाव्या हातावर दुखापत केल्याचे म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी वंदना शिंदे, रोहित शिंदे, प्रमिला शिंदे, संध्या शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Clash between families over land dispute in Vadavalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.