जिल्ह्यात कोरोनाने ३२ रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्या रोडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:45+5:302021-05-21T04:33:45+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृतांचा संख्या वाढली असून, ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृतांचा संख्या वाढली असून, ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ९९२ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोडावली असून, ३३९ रुग्ण आढळल्याने एकूण ३१,६२२ रुग्ण झाले आहेत. गेल्या २४ तासात सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा जास्त ६१० रुग्ण बरे झाले आहे. बरे झालेले एकूण २६,५३३ रुग्ण आहेत.
जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले असून ३.१३ टक्के झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतांमध्ये गेल्या २४ तासातील १२ रुग्ण असून त्यामध्ये मागील काही दिवसांतील २० रुग्णांचा समावेश करण्यात आला आहे. मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ८ रुग्ण, दापोलीतील १२, खेडमध्ये ४, चिपळुणात २ आणि संगमेश्वर, राजापूर १, मंडणगड येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. आतापर्यंत झालेेल्या वर्षभरातील मृतांमध्ये ३२ ही संख्या सर्वात जास्त आहे.
जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण ४०९७ आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १७.२६ टक्के असून बरे होण्याचे प्रमाण ८३.९० टक्के आहे. जिल्ह्यात १,६९२ जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये १,३५३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त ११२ रुग्ण आहेत. तर खेड, गुहागर आणि मंडणगडमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नसून दापोलीत ४, चिपळुणात २८, संगमेश्वरमध्ये ४, लांजात २ आणि राजापुरातील २० रुग्ण आहेत. त्यामध्ये दिवसभरातील १७० रुग्ण तर मागील १६९ रुग्ण आहेत.