corona in ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा दीडशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:59 AM2020-05-25T11:59:38+5:302020-05-25T12:00:55+5:30

जिल्हावासियांना शनिवारी दिवसभर दिलासा मिळाला असतानाच शनिवारी रात्री १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारी सायंकाळी आणखीन ६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५१ वर जाऊन पोहोचली आहे़

corona in ratnagiri: The number of corona victims in Ratnagiri district has crossed one and a half hundred | corona in ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा दीडशे पार

corona in ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा दीडशे पार

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १५१, कोरोनाबाधित सर्व मुंबईकर रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, खेडमध्ये आढळले रुग्ण

रत्नागिरी : जिल्हावासियांना शनिवारी दिवसभर दिलासा मिळाला असतानाच शनिवारी रात्री १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारी सायंकाळी आणखीन ६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५१ वर जाऊन पोहोचली आहे़.

शनिवारी रात्री आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ४, चिपळूणमधील ३ तर संगमेश्वर, लांजा, राजापूरमधील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. तर रविवारी खेड तालुक्यातील ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी - चिंचवाडा येथील १६ वर्षीय युवकाचा समावेश असून, तो २३ मे रोजी मुंबईतील वडाळा येथून रत्नागिरीत दाखल झाला होता. भोके - मठवाडी येथे आलेल्या ६० वर्षीय वृद्धाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. याच गावातील ४३ वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर करबुडे रामगडेवाडी येथील ५५ वर्षीय प्रौढाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण १९ मे रोजी मुंबईतील सांताक्रुझ येथून गावी आले होते.

चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते - पावसकर वाडी येथील ३९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला घाटकोपर येथून रत्नागिरीत दि. १६ मे रोजी आली होती. तसेच वाघिरे मोहल्ला येथे मुंब्रा येथून आलेल्या १८ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कळंबट - बौद्धवाडी येथील ३७ वर्षाच्या प्रौढाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते कांदिवली भागातून आले असून, १८ मेपासून कामथे येथील रुग्णालयात दाखल आहेत.

संगमेश्वर तालुक्यातील फेपडेवाडी, मानसकोंड येथील ३० वर्षाच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण विरार येथून दि. १६ मे रोजी दाखल झाला होता. त्यालाही साडवली येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच निवे येथील १८ वर्षाच्या युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.

लांजा तालुक्यातील वाघ्रट येथे १८ मे रोजी मुंबईहून आलेल्या १२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर वाघ्रट - पाटणेवाडीतील २८ वर्षीय तरुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक मुंबई - नालासोपारा येथून १८ मे रोजी आला होता.

राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील पती-पत्नींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोघे १८ मे रोजी मुंबईतील कांदिवली येथून गावी आले होते. त्या दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून मिरज येथे पाठविण्यात आलेल्या ७ नमुन्यांचा अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यापैकी एक अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरीत ६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालांमध्ये तळे (ता. खेड) येथील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. त्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. ते मुंबईतून आलेले असून, ताप आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. अन्य दोघांमध्ये एकजण ठाणे येथून वरवली - आंबवली आहे तर दुसरा मुलुंड येथून दयाळ येथे गावी आलेला आहे.

Web Title: corona in ratnagiri: The number of corona victims in Ratnagiri district has crossed one and a half hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.