लोटेत गोवा बनावटीचा मद्याचा मोठा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:57 AM2021-04-05T11:57:08+5:302021-04-05T11:58:50+5:30
liquor ban Chiplun Ratnagiri-खेड तालुक्यातील लोटे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून ६० हजार रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला तसेच संगमेश्वर तालुक्यातील कुंचाबे येथे गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत विकी अशोक गोरीवले (३९, रा. चिपळूण) व मनोज पांडुरंग जागुष्टे (४६, रा. कुचांबे, संगमेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे येथे राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून ६० हजार रुपये किमतीचा गोवा बनावट विदेशी मद्याचा मुद्देमाल जप्त केला तसेच संगमेश्वर तालुक्यातील कुंचाबे येथे गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत विकी अशोक गोरीवले (३९, रा. चिपळूण) व मनोज पांडुरंग जागुष्टे (४६, रा. कुचांबे, संगमेश्वर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी अवैध दारूविरोधात मोहीम सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची विक्री व वाहतूक होऊ नये म्हणून अधीक्षक तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी विशेष नियोजन केले आहे.
दरम्यान, खेड तालुक्यातील लोटे येथे गोवा बनावट विदेशी मद्याचा साठा केला असल्याची माहीती भरारी पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी गोवा बनावट गोल्डन एस व्हिस्कीचा ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच भरारी पथकाने केलेल्या दुसऱ्या कारवाईत १३०० रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली. ही कारवाई संगमेश्वर-कुचांबे येथे करण्यात आली. भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, जवान निनाद सुर्वे, सहकारी महेश पाटील, रोहन तोडकरी यांनी केली.