CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात आणखीन ८ कोरोनाबाधीत, रूग्ण संख्या ११६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:09 PM2020-05-21T18:09:26+5:302020-05-21T18:12:44+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात आणखीन ८ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात ११६ रूग्ण संख्या झाली आहे. काल दिवसभरात २४ रूग्णांची वाढ झाली आहे.
रत्नागिरी - जिल्ह्यात आणखीन ८ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात ११६ रूग्ण संख्या झाली आहे. काल दिवसभरात २४ रूग्णांची वाढ झाली आहे.
आणखी १४ जण कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल बुधवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याने रुग्णांची शंभरी पार झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ११६ रुग्ण सापडले आहेत. त्यातील ४४ जण बरे झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी सकाळी मिळालेल्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात मिळालेल्या अहवालानुसार १६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यातील दोन रुग्ण जुनेच असून त्यांचे स्वब पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आता १४ रुग्ण नव्याने आढळले आहेत.
मिरजेतून एकूण ८२ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ६६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रत्नागिरीतील १० अहवाल प्राप्त झाले असून त्यात ६ पॉझिटीव्ह आहेत. (त्यातील दोन रुग्ण जुने असून, चार नवीन आहेत) खेड तालुक्यातील कळंबणी येथील ६० अहवाल प्राप्त झाले असून, सर्व निगेटिव्ह आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील ६ अहवाल प्राप्त झाले असून सर्व पॉझिटिव्ह आहेत. गुहागर तालुक्यातील ४ अहवाल मिळाले असून चारही पॉझिटीव्ह आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व व्यक्ती विलगीकरणात होत्या. यातील बहुतेक जण मुंबईहून रत्नागिरीत आले आहेत.