coronavirus:रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आणखी तीन कोरोनाबाधीत रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 01:02 AM2020-05-15T01:02:09+5:302020-05-15T01:03:18+5:30

मिरज येथून उशीरा रात्री ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातील ७० जणांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

coronavirus: Three more coronavirus patients found in Ratnagiri district | coronavirus:रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आणखी तीन कोरोनाबाधीत रुग्ण

coronavirus:रत्नागिरी जिल्ह्यात सापडले आणखी तीन कोरोनाबाधीत रुग्ण

Next

रत्नागिरी : गुरुवारी मध्यरात्री प्राप्त अहवालानुसार रत्नागिरी जिल्ह्यात आणखी तिघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात रत्नागिरी तालुक्यातील एक तर संगमेश्वर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.

मिरज येथून उशीरा रात्री ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातील ७० जणांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून दोन नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील १ अहवाल पॉझिटिव्ह तर १ निगेटिव्ह आला आहे. एक परिचारिका कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातून पाठवण्यात आलेले दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील एक भडकंबा तर दुसरा रुग्ण देवळे येथील आहे. या अहवालानंतर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता  ७७ झाले आहेत.

Web Title: coronavirus: Three more coronavirus patients found in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.