खेड नगरपालिकेसह नागरिकांच्या ४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:32 AM2021-07-31T04:32:14+5:302021-07-31T04:32:14+5:30

खेड : शहरातील नागरिकांच्या खासगी मालमत्तांसह नगरपालिकेचे सुमारे ४१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये ...

Damage to property worth Rs 41 crore of citizens including Khed municipality | खेड नगरपालिकेसह नागरिकांच्या ४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान

खेड नगरपालिकेसह नागरिकांच्या ४१ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान

Next

खेड : शहरातील नागरिकांच्या खासगी मालमत्तांसह नगरपालिकेचे सुमारे ४१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये २१ कोटी ६७ लाख रुपयांच्या नगरपालिकेच्या मालमत्तेचा समावेश आहे.

खेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जगबुडी व नारिंगी नदी किनाऱ्यावर वसलेले संपूर्ण खेड शहर पुराच्या पाण्याने वेढले हाेते. खेड बाजारपेठेतील काही भाग व नागरी वसाहतीत तब्बल ४८ तास पुराचे पाणी साचून राहिल्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाचे खेड महसूल विभागातर्फे तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले. दिनांक २८ रोजीपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार खेड पूरग्रस्त भागात २४४ निवासी घरांचे २ कोटी ५ लाख ३० हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. यासोबतच ५२२ व्यावसायिक आस्थापनांचे १६ कोटी ७५ लाख ८१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच नगरपालिका मालकीच्या मालमत्तांचे २१ कोटी ६७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासह अन्य १४ ठिकाणी ५४ लाख ६२ हजार ५०० रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. शहर व परिसरात एकूण ४१ कोटी २ लाख ७४ हजार ३०९ रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शहर नगरपालिकेची इमारत, बोरज धरण, अंतर्गत रस्ते, मटण व भाजी मार्केट, बायोगॅस प्रकल्प, उद्याने, दवाखाना इत्यादींचा समावेश आहे.

--------------------------------

आराेग्य कर्मचाऱ्यांची पाच पथके कार्यरत

खेड शहरातील पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागात गाळ व कचरा साचून राहिल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती लक्षात घेऊन पालिकेतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांची पाच पथके दिनांक २५ पासून कार्यरत झाली आहेत. या पथकांतर्फे कासार आळी, ब्राह्मण आळी, साठे, तांबे, पौत्रिक, कौचाली, पटेल मोहल्ला, झोपडपट्टी, गुजर आळी, तीनबत्ती नाका, बाजारपेठ, पानगल्ली, गांधीचौक, दापोली नाका, पदुमलेवाडी एकवीरा नगर, नगरपालिका दवाखाना परिसर, खांबतळे झोपडपट्टी आदी ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

Web Title: Damage to property worth Rs 41 crore of citizens including Khed municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.