दोर तुटल्याने बसरा स्टार जहाजाला धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 02:14 AM2020-06-22T02:14:02+5:302020-06-22T02:14:10+5:30
रत्नागिरीतील मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधा-यावर धडकले होते़ उसळणा-या लाटांच्या मा-याने गेले १८ दिवस बंधाºयावर आदळल्याने जहाजाचे दोर तुटले आहेत.
रत्नागिरी : निसर्ग वादळामुळे भगवती बंदरातून भरकटलेले दुबईतून आलेले बसरा स्टार जहाज रत्नागिरीतील मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधा-यावर धडकले होते़ उसळणा-या लाटांच्या मा-याने गेले १८ दिवस बंधाºयावर आदळल्याने जहाजाचे दोर तुटले आहेत. त्यामुळे हे जहाज फुटण्याचा धोका आणखी वाढला आहे़
निसर्ग वादळामुळे ३ जून रोजी हे जहाज भगवतीबंदर येथे नांगरावर ठेवण्यात आले होते़ निसर्ग वादळाने त्या दिवशी रात्रभर जोरदार पावसासह सोसाट्याचा वाराही वाहत होता़ त्यामुळे समुद्रातून किनाºयावर उंच लाटा उसळत होत्या़ भगवती बंदर येथे नांगरावर असलेले बसरा स्टार हे जहाज सोसाट्याच्या वाºयासह उसळणाºया लाटांच्या माºयाने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नांगरावरून अचानक सुटले़ त्यानंतर भरकटलेले जहाज सुरुवातीला पांढरा समुद्राच्या दिशेने चालले असतानाच अन्य एका जहाजाने त्या बसरा स्टार जहाजाला खेचून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून ते जहाज सुटल्याने अखेर ते भरकटत भाटीमिºया किनाºयावर धडकले होते़ या जहाजामध्ये लाखो लिटर्स डिझेल आहे. जहाजामधील डिझेल अजूनही रिकामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे जहाज फुटल्यास त्यातील डिझेल समुद्राच्या पाण्यात मिसळण्याची भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.