वेळास समुद्रकिनारी सापडले मृत कासव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 11:25 AM2021-03-16T11:25:44+5:302021-03-16T11:27:20+5:30
wildlife Ratnagiri- कासवांचे गाव अशी ओळख असलेल्या वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनाऱ्यावर रविवारी मृतावस्थेत कासव आढळले आहे. कासवाच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय वन विभागाने वर्तविला आहे.
मंडणगड : कासवांचे गाव अशी ओळख असलेल्या वेळास (ता. मंडणगड) येथील समुद्रकिनाऱ्यावर रविवारी मृतावस्थेत कासव आढळले आहे. कासवाच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय वन विभागाने वर्तविला आहे.
वेळास येथे एक तपाहून अधिक काळ सागरी कासव संवर्धन मोहीम सुरू आहे. या मोहिमेमुळेच जगाच्या नकाशावर कासवांचे गाव म्हणून वेळास गाव ओळखले जात आहे. याठिकाणी मृतावस्थेत आढळलेले कासव सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षे वय असलेले नर जातीचे आहे. मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.
या कासवाचा खोल समुद्रात मृत्यू झाला असून, त्यांचा मृतदेह लाटांच्या प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर फुगलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर पंचनामा करुन कासवाचा मृतदेह समुद्रकिनारी वाळूत खड्डा करुन पुरण्यात आला आहे.