रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:30 AM2021-04-17T04:30:27+5:302021-04-17T04:30:27+5:30
रस्त्याच्या कडेला डांबरीकरण रत्नागिरी : शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीला लागून असलेल्या चर्मालय ते धनजीनाकापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ...
रस्त्याच्या कडेला डांबरीकरण
रत्नागिरी : शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीला लागून असलेल्या चर्मालय ते धनजीनाकापर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातच केबल व पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. या रस्त्याच्या खोदाई केलेल्या चरावर डांबरीकरण करून ते बुजविण्यात आले. या रस्त्यावर खड्डे पडल्याने प्रवास करणे धोकादायक व त्रासदायक ठरत आहे.
बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई कमी
राजापूर : या वर्षीही जिल्हा परिषद कृषी विभागाकडून गावोगावी लोकसहभागातून बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लांबलेल्या पावसामुळे डिसेंबर महिन्यात या कामाला सुरुवात झाली. या बंधाऱ्यांमुळे आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने, पाणीटंचाई कमी होण्यास बंधाऱ्यांची मदत मिळाली आहे.
मच्छीमार हवालदिल
रत्नागिरी : मच्छीमारांसमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. मागील मोसमात मच्छीमारांचे कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले असतानाच, या चालू मोसमामध्येही मासे मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे मच्छीमारांना खलाशांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत, तर डिझेलचा खर्चही भागत नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.
गाळ उपसा करण्याची मागणी
रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये खाडीच्या आजूबाजूच्या गावातील खोल समुद्रात मासेमारीसाठी ये-जा करण्यास मांडवी बंदराच्या समोरचे मुख आहे. मच्छीमारांसाठी हा एकमेव मार्ग आहे. भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदरातील गाळ काढण्यासाठी अनेकदा मच्छीमारांनी मागणी करूनही त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा गाळ कधी उपसणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभे
चिपळूण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने विशेष लक्ष घालून काही नियम व अटींचे पालन करण्याचे आदेश जनतेला दिले आहेत. अखेर लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचे अनेक रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.