पाॅझिटिव्ह असूनही चढला बाेहल्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:27+5:302021-05-08T04:32:27+5:30

गुहागर : लग्नासाठी सज्ज असलेला नवरदेवच चक्क पाॅझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर येथे बुधवारी घडला. बरं, आपण ...

Despite being positive, he climbed the ladder | पाॅझिटिव्ह असूनही चढला बाेहल्यावर

पाॅझिटिव्ह असूनही चढला बाेहल्यावर

Next

गुहागर : लग्नासाठी सज्ज असलेला नवरदेवच चक्क पाॅझिटिव्ह आल्याचा धक्कादायक प्रकार गुहागर तालुक्यातील शीर येथे बुधवारी घडला. बरं, आपण पाॅझिटिव्ह आहाेत, हे माहीत असूनही नवरदेव बाेहल्यावर चढल्याने २३ जणांवर गृहअलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे, तर वऱ्हाडी मंडळींना ५० हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे.

गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील मुलाचे लग्न शीरमधील मुलीबराेबर ठरले हाेते़ हा विवाह ५ मे राेजी हाेता. विवाहासाठी प्रांताधिकारी यांच्याकडून परवानगी घेण्यात आली हाेती. त्यातील अटीप्रमाणे वधुवराकडील मंडळींनी आबलाेली प्राथमिक आराेग्य केंद्रात ४ मे राेजी काेराेनाची तपासणीही केली हाेती. प्रांतांनी दिलेल्या परवानगीची एक प्रत शीर ग्रामपंचायतीलाही देण्यात आली हाेती. गावात काेराेनाचा प्रादुर्भाव हाेऊ नये, म्हणून सजग असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने वधुकडील मंडळींचे काेराेना तपासणी अहवाल आधीच तपासले हाेते. ५ मे राेजी शीरचे सरपंच विजय धाेपट, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत पवार, तलाठी बी़.एच. राठाेड, ग्रामसेवक एकनाथ पाटील, पाेलीस पाटील संदीप घाणेकर हे सर्वजण विवाहस्थळी गेले हाेते.

विवाहादरम्याने वरपक्षाकडे काेराेना तपासणीचा अहवाल मागण्यात आला. त्यावेळी आम्ही चाचणी केली असून, अजून अहवाल आलेला नसल्याचे सांगण्यात आले. विवाह साेहळ्यात विघ्न नकाे, म्हणून प्रशासनाने अधिक चाैकशी न करता, प्रांतांच्या आदेशाप्रमाणे विवाह पार पाडा, अशी सूचना दिली. वरपक्षाकडील काेराेना चाचणीची खात्री करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक यांनी आबलाेली प्राथमिक आराेग्य केंद्रात चाैकशी केली. त्यावेळी नवरदेव काेराेनाबाधित असल्याचे समाेर आले, ही माहिती मिळताच प्रशासकीय पथक विवाहस्थळी दाखल झाले आणि या पथकाने वरपक्षाकडे चाैकशी सुरू केली. दाखल्याची मागणी केली.

अखेर वराने आपण काेराेनाबाधित असल्याची कबुली दिली. ही बाब उघड हाेताच, शासकीय पथकाने नवरदेव काेविड १९ पाॅझिटिव्ह असल्याने साथराेग नियंत्रण प्रसाराबद्दल असा उल्लेख करून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला, तसेच नवरा मुलगा काेराेनाबाधित असल्याने सर्वांना तातडीने गृहअलगीकरणात जाण्याच्या सक्त सूचना दिल्या. या कारवाईनंतर नवरदेव काेराेनाबाधित असतानाही शीरमधील मंडळींनी वधूची सासरी पाठवणी केली आहे, तर नवरदेवासह सर्वांची वरात गृहअलगीकरणात पाेहाेचली आहे.

Web Title: Despite being positive, he climbed the ladder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.