धामणवणे ग्रामपंचायतीने दोन महिलांना दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:21 AM2021-06-29T04:21:34+5:302021-06-29T04:21:34+5:30
चिपळूण : शहरालगतच्या धामणवणे ग्रामपंचायतीने गावातील दोन महिलांना मदतीचा हात दिला आहे. आपत्कालिन स्थिती म्हणून औषध उपचारांसाठी दोन महिलांना ...
चिपळूण : शहरालगतच्या धामणवणे ग्रामपंचायतीने गावातील दोन महिलांना मदतीचा हात दिला आहे. आपत्कालिन स्थिती म्हणून औषध उपचारांसाठी दोन महिलांना प्रत्येकी पाच हजारांची मदत ग्रामपंचायतीने दिली आहे. सरपंच सुनील सावंत व सदस्यांच्या उपस्थितीत मदतीचा धनादेश या दोन्ही कुटुंबांना देण्यात आला.
धामणवणे येथील ज्योती पवार या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या औषध उपचाराला मदत म्हणून ग्रामपंचायतीने पाच हजारांची मदत दिली. तर मंगेश उंडरे यांचे काही दिवसांपूर्वीच ऐन तारुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. या कुटुंबाला मदत म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या १५ वा वित्त आयोगमधून गरजूंसाठी आपत्कालीन मदत म्हणून दिली आहे. हे दोन्ही धनादेश सरपंच व सदस्यांनी दोन्ही कुटुंबांच्या घरी जाऊन सुपूर्द केले. यावेळी सरपंच सुनील सावंत, भारिपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, उपसरपंच लक्ष्मी वरेकर, संतोष वरेकर, सदस्य अंजू उंडरे, रिया सावंत, नितीन शिगवण, विजय गुंडरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------------------
धामणवणे येथील मयुरी उंडरे यांना मदतीचा धनादेश सरपंच सुनील सावंत यांनी दिला.