लांजा : महाराष्ट्र राज्य शासनाचा कृषिभूषण पुरस्कार प्राप्त, प्रगतिशील शेतकरी दिलीप तथा भाऊ नारकर यांचे उपचारांदरम्यान कोल्हापूर येथे निधन झाल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिलीप तथा भाऊ नारकर हे आपल्या हाॅटेल व्यवसायाबरोबरच त्यांनी शेतीची कास धरून शेतीमध्येच सोनं पिकविण्याची मनाशी खूणगाठ बांधली. आजगे येथील शेती फाॅर्म तयार करून त्यामध्ये कामगारांबरोबर काम करणारे भाऊ यांनी शेतीमध्ये प्रगती करीत गेले. देवधे येथील कृषी विद्यापीठ येथील प्रा. वैभव शिंदे यांच्या मदतीने त्यांनी आधुनिक पद्धतीच्या शेतीकडे आपला भर दिला आणि तालुक्यात प्रगतिशील शेतकरी म्हणून उदयाला आले.
शेती बरोबरच त्यांनी शैक्षणिक कार्यामध्येदेखील मोठा वाटा आहे. आसगे येथील ऊर्मिला माने विद्यालयाच्या जडणघडणीत भाऊंचे मोठे योगदान आहे. दिलीप तथा भाऊ नारकर यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.