संगमेश्वर क्रमांक ३ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:31 AM2021-04-04T04:31:53+5:302021-04-04T04:31:53+5:30
कॅप्शन : जिल्हा परिषद आदर्श शाळा संगमेश्वर क्रमांक ३ साठी समत्व ट्रस्ट, ठाणे (मुंबई) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात ...
कॅप्शन : जिल्हा परिषद आदर्श शाळा संगमेश्वर क्रमांक ३ साठी समत्व ट्रस्ट, ठाणे (मुंबई) तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरूख : जिल्हा परिषद आदर्श शाळा संगमेश्वर क्र. ३ कसबा (ता. संगमेश्वर) शाळेला समत्व ट्रस्ट, ठाणे (मुंबई) तर्फे शाळेच्या गरजा विचारात घेऊन शाळेला शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. त्यामध्ये प्रिंटर, स्कॅनर व ई-लर्निंग सुविधा भेट देण्यात आली.
शैक्षणिक साहित्य वितरणासाठी समत्व ट्रस्टचे उपाध्यक्ष रूपेश कांबळे, खजिनदार गणपत दाभोळकर, विश्वस्त रेश्मा वाजे, विश्वस्त नरेंद्र खानविलकर, मार्गदर्शक दत्ताराम कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अक्षता शिगवण, सुनीता तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कदम, उपाध्यक्ष अनंत जंगम, माजी अध्यक्ष मनोहर तांबे, माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रशांत तांबे, जाखमाता मंडळाचे अध्यक्ष प्रमोद खापरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा तांबे, सारिका तांबे उपस्थित होते. शाळेतर्फे शिक्षक आदम सय्यद यांनी सर्वांचे स्वागत केले.