रत्नागिरी : स्वयंरोजगार करताना कोणत्याही कामाला कमी लेखू नका. आज महाराष्ट्रात कौशल्य विकासाचे ६०० तर राष्ट्रीयस्तरावर २१ हजार प्रकार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती घेण्याची गरज आहे. स्वयंरोजगार आपल्याला आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळवून देतो. जेव्हा आपण स्वत: घडत असतो, तेव्हा एकप्रकारे आपण समाज आणि देश घडवत असतो याचे भान ठेवून आजच्या तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळावे, असे आवाहन रत्नागिरीतील उद्योजक उदय लोध यांनी केले.
गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि खादी ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंरोजगार शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन व्यावसायिक उदय लोध यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचा मराठी विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करत असतो. याच अनुषंगाने खादी ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्यातून महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उद्योजक उदय लोध, मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवराज गोपाळे यांनी केले. आज तरुण आपल्या सोयीच्या परिघाबाहेर जाण्यास तयार नसतात. मात्र, ही मानसिकता बदलली तर आज स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण आपला सर्वांगिण विकास साधू शकतो, असे मत गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक व्यवसाय संधींची माहिती करून दिली.
‘उद्योजक व्हा’ या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत नम्रता शिंदे प्रथम, पूर्वा चुनेकर आणि समीक्षा पालशेतकर विभागून द्वितीय तर कोमल कांबळे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. सर्व विजेत्यांना खादी ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले.
चार सत्रांमध्ये झालेल्या स्वयंरोजगार शिबिरामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यातील पहिल्या सत्रात मँगो इव्हेंट्सचे अभिजीत गोडबोले यांनी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’विषयी माहिती दिली.दुसºया सत्रात ‘कोकणातील फळप्रक्रिया : मूल्यवर्धन’ या विषयांतर्गत श्रीधर ओगले यांनी कोकणातील फळप्रक्रिया आणि त्यांचे मूल्यवर्धन, त्याद्वारे निर्माण होणाºया रोजगार संधी याबाबत माहिती दिली. तिसºया सत्रात स्वप्नपूर्ती इन्स्टिट्यूटच्या नीता माजगावकर यांनी ‘मेकअप आणि हेअरस्टाईल’ याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराच्या चौथ्या सत्रांमध्ये आपला आवाज आपल्या स्वयंरोजगाराचे साधन कशाप्रकारे बनू शकतो याबाबत अभिनेत्री लतिका सावंत यांनी मार्गदर्शन केले. या स्वयंरोजगार शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.विजेत्यांचा गौरव : वादविवाद, निबंध स्पर्धावादविवाद आणि निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ‘स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नाही’ या विषयावर घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत तैबा बोरकर, मैत्रेयी बांदेकर यांनी प्रथम, ऐश्वर्या आचार्य, नारायणी शहाणे यांनी द्वितीय तर ऋषिकेश लांजेकर, अजिंक्य प्रभुदेसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला.मराठी विभाग आणि खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे आयोजन.गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातील शिबिराला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद.‘उद्योजक व्हा’ विषयावरील निबंध स्पर्धेत नम्रता शिंदेने प्रथम क्रमांक पटकावला.कोकणातील फळप्रक्रिया : मूल्यवर्धन या विषयांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.