रत्नागिरी : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या या भयावह स्थितीचा विचार करून मुंबईकरांनी कारण नसेल तर गावाला येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर मे महिन्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईकर मोठ्या संख्येने गावी परतल्याने मे महिन्यापासून रुग्णांची संख्या वाढत गेली. त्यानंतर गणपती उत्सवासाठी आलेल्या मुंबईकरांमुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातही पुन्हा संख्या दुपटीपेक्षाही अधिक झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा रुग्णसंख्या कमी झाली.मात्र, मध्यंतरीच्या काळात लोकांनी दाखविलेली बेफिकिरी तसेच मास्क, सॅनिटायझर यांचा टाळलेला वापर, सोशल डिस्टन्सिंगचा विसर यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू लागला आहे. त्यात भर पडली ती मार्च महिन्यातील शिमगोत्सवासाठी आलेल्या मुंबइकरांची कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबई-पुण्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याने मार्चपासून ही संख्या वाढू लागली आहे.जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक होऊ लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्ह्यात येणाऱ्या मुंबईकरांमुळे संसर्ग वेगाने वाढत आहे. भविष्यात ही संख्या सध्याच्या चौपट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी मुंबईहून येणाऱ्यांनी महत्त्वाचे कारण असेल तरच यावे, अन्यथा सध्या येणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मुंबईसह अन्य भागातून येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी प्रत्येक नाक्यावर होणार असून, व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.तीन हजारचा टप्पा पार१ ते १५ मार्च २६७ रुग्ण तर १६ ते ३१ मार्च या काळात तब्बल ७८८ रुग्ण सापडले. १ ते १५ एप्रिल या कालावधीत रुग्ण संख्येने तब्बल ३ हजारांचा टप्पा ओलांडला असून ही संख्या ३००९ वर पोहोचली आहे. तर या पंधरवड्यात मृत्यूची संख्या ३४ झाली आहे. वाढती रुग्ण संख्या ही जिल्ह्यासाठी चिंताजनक असून, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाला कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.
ठोस कारणाशिवाय मुंबईतून येऊ नका, जिल्हाधिकारी यांचे चाकरमान्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 2:38 PM
CoronaVIrus Ratnagiri : सध्या रत्नागिरीत कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या या भयावह स्थितीचा विचार करून मुंबईकरांनी कारण नसेल तर गावाला येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक सीमांवर पोलीस बंदोबस्त तैनात वाहनांची कसून तपासणी, पॉझिटिव्ह येणाऱ्यांना गृह अलगीकरण