रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ७ टप्प्यांत जिल्ह्यातील २०० पोलीस पाटलांशी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी लॉकडाऊन निर्बंध, ग्राम दत्तक योजना, संस्थात्मक विलगीकरण याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कायदा आणि सुव्यवस्था सांभाळतानाच डॉ. मोहितकुमार गर्ग आणि रत्नागिरी पोलिसांनी सामाजिक बांधीलकी म्हणून कोविड १९ च्या नियंत्रणासाठी प्रशासनासोबत हातात हात घालून काम केले. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची गावागावांत योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी डॉ. गर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांची ऑनलाईन बैठक बोलावली होती.
यावेळी ग्राम दत्तक योजना, संस्थात्मक विलगीकरण आणि सध्याचे निर्बंध यावेळी पोलीस पाटील यांच्या कर्तव्य आणि जबाबदारीबद्दल मार्गदर्शन केले. जिल्ह्यात २०० पोलीस पाटील असल्याने डॉ. गर्ग यांनी ७ टप्प्यांत हे मार्गदर्शन केले.