दहशत निर्माण करणारा उबेद होडेकर रत्नागिरीच्या तीन तालुक्यांतून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:53 AM2019-04-23T10:53:11+5:302019-04-23T10:55:38+5:30

रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक व रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रामध्ये दहशत निर्माण करुन विविध गुन्हे करणारा उबेद निजामुद्दीन होडेकर (अजिजा हाईट्स, बी. विंग, रुम नं. २०२, उद्यमनगर, रत्नागिरी) याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) अन्वये रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा तालुक्यांतून ९ महिन्यांकरिता हद्दपार करण्याचे आदेश रत्नागिरीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले आहेत.

Embarrassed Ubaid Hodekar from the three talukas of Ratnagiri | दहशत निर्माण करणारा उबेद होडेकर रत्नागिरीच्या तीन तालुक्यांतून हद्दपार

दहशत निर्माण करणारा उबेद होडेकर रत्नागिरीच्या तीन तालुक्यांतून हद्दपार

googlenewsNext
ठळक मुद्देउबेद होडेकर रत्नागिरीच्या तीन तालुक्यांतून हद्दपारदहशत निर्माण करुन विविध दखलपात्र गुन्हे दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक व रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रामध्ये दहशत निर्माण करुन विविध गुन्हे करणारा उबेद निजामुद्दीन होडेकर (अजिजा हाईट्स, बी. विंग, रुम नं. २०२, उद्यमनगर, रत्नागिरी) याला मुंबई पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) अन्वये रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा तालुक्यांतून ९ महिन्यांकरिता हद्दपार करण्याचे आदेश रत्नागिरीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिले आहेत.

उबेद निजामुद्दीन होडेकर याच्याविरुध्द रत्नागिरी ग्रामीण व रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात सन २०१४ पासून गर्दी मारामारी, दुखापत वगैरे यासारखे एकूण ४ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.

त्याच्यावर कायद्याचा वचक बसविणे आवश्यक असल्याने व समाजातील व्यक्तिंच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यासाठी त्याला २३ एप्रिल २०१९ची निवडणूक मतदान दिवस व ज्यावेळी न्यायालयीन तारीख असेल तो दिवस वगळून रत्नागिरी, संगमेश्वर व लांजा तालुक्यातून ९ महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे.

Web Title: Embarrassed Ubaid Hodekar from the three talukas of Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.