रत्नागिरी : प्रचंड गदारोळात नाटे येथील आयलॉग जेटी प्रकल्पाच्या पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत आयलॉग पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड या जेटी कंपनीच्या १0 एमटीपीए बंदर प्रकल्पाविषयी नाटे येथील प्रकल्पस्थळावर आज जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते.
या जनसुनावणीत म्हणणे मांडण्याची संधी देउनही कोणीही पुढे आले नव्हते. प्रत्यक्ष जनसुनावणीला सकाळी नाटे येथील प्रकल्पस्थळावर प्रारंभ झाला तेव्हाही उपस्थित जनसमुदाय या प्रकल्पाविरोधात घोषणाबाजी करत होता.या प्रकल्पाविषयी ऐकून घेण्याचे आवाहन प्रत्यक्ष जिल्हाधिकारी करत होते, मात्र त्यांचे आवाहन न ऐकताच समुदाय घोषणाबाजी करत होते.
त्यानंतर ऐकुन न घेतल्यास एकतर्फी अहवाल देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले. सर्वांना बोलण्याची संधी आहे, ऐकुन घ्या असे आवाहन त्यांनी केले, मात्र उपस्थित जनसमुदाय मोठ्या प्रमाणात प्रकल्प विरोधी घोषणा देत आरडा ओरडा करत होते.
अखेर प्रकल्पाविषयी म्हणणे माडण्यास पुन्हा संधी देउनही कोणीहि पुढे आले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी पूर्ण करत असल्याचे जाहीर केले. प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळातच ही पर्यावरणीय जनसुनावणी पार पडली. तरीही प्रचंड गदारोळ आणि घोषणाबाजी सुरूच होती.