भाड्याची माणसे आणली तरी राजकारणातून संपवू शकत नाहीत : रामदास कदम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:22 PM2023-03-05T15:22:45+5:302023-03-05T15:23:01+5:30

उद्धव ठाकरे पहिलाच नेता असेल की, स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला राजकारणातून संपवायचे आणि दुसऱ्याचा आमदार भाड्याने विकत घ्यायचा. पण, असे प्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी केले नव्हते.

Even if mercenaries are brought in, they cannot eliminate them from politics: Ramdas Kadam | भाड्याची माणसे आणली तरी राजकारणातून संपवू शकत नाहीत : रामदास कदम

भाड्याची माणसे आणली तरी राजकारणातून संपवू शकत नाहीत : रामदास कदम

googlenewsNext

हर्षल शिराेडकर

खेड : उद्धव ठाकरे पहिलाच नेता असेल की, स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला राजकारणातून संपवायचे आणि दुसऱ्याचा आमदार भाड्याने विकत घ्यायचा. पण, असे प्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी केले नव्हते. मुंबई, पुणे, ठाणे येथून भाड्याची माणसे आणून किती प्रयत्न केले तरी रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना राजकारणातून कोणीही संपू शकत नाही, असा घणाघात माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी जामगे (ता. खेड) येथे बोलताना केला.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खेड येथील गाेळीबार मैदानावर जाहीर सभा आयाेजित केली हाेती. या सभेबाबत बाेलताना रामदास कदम यांनी प्रसार माध्यमांशी बाेलताना ताेंडसुख घेतले. ते म्हणाले की, एकदा नाही शंभरवेळा जरी उद्धव ठाकरे येथे आले तरी आम्हाला पराभूत करू शकत नाहीत. उलट तुम्ही जितक्या वेळा याल तेवढे अधिक लीड आमचे वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांचा धसका घेतला आहे. त्यामुळे खेडमध्ये बाहेरची माणसे आणून विराट सभेचा दिखावा केला जात आहे. जणू ही शिवाजीपार्कचीच सभा वाटत आहे. बाहेरची माणसे आणून स्थानिक राजकारण करता येत नाही, असा टाेला त्यांनी लगावला. दापोली मतदारसंघातील दोन-चार टक्के तरी लोक यांच्यासोबत आहेत का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या सभेला १९ तारखेला त्याच ठिकाणी, त्याच मैदानावर सभा घेणार असून, व्याजासहित उत्तरे देणार असल्याचे ते म्हणाले. या प्रत्युत्तर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई व आमदार भरत गोगावले उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Even if mercenaries are brought in, they cannot eliminate them from politics: Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.