आंजर्ले समुद्रकिनारी वाळूचा बेसुमार उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:24 AM2021-06-02T04:24:22+5:302021-06-02T04:24:22+5:30
खेडमध्ये कारवाई खेड : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ दुकान व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये राजेश कोळणकर, सनी ...
खेडमध्ये कारवाई
खेड : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ दुकान व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये राजेश कोळणकर, सनी स्पेअरपार्टस्, राजन चव्हाण, राजन इलेक्टिकल्स, अब्दुल कौचाली, भारत ट्रेडिंग, बासीत ढेणकर, शीतल फूटवेअर, अमीर महाडिक जनरेशन मेन्स वेअर, रियाज देसाई, गौसिया बेकरी, स्टार फॅशन, शिवाजी पान जनरल स्टोअर्स, बुटाला ब्रदर्स आदी व्यावसायिकांचा समावेश आहे.
भाताच्या उत्पादनासाठी युरिया ब्रिकेटचा वापर करा
चिपळूण : भाताच्या अधिक उत्पादनासाठी युरिया ब्रिकेटचा वापर करा, असे आवाहन येथील कृषी विभागाचे पर्यवक्षक मनोज गांधी यांनी केले आहे. भात पिकासाठी मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांची गरज असते. भात हे एकमेव पीक अमोनिकल स्वरूपात नत्राचे शोषण करते. सध्या खते फेकून देण्याची पद्धत राबवली जाते. त्यामुळे खते जमिनीच्या वरील थरामध्ये पडतात. भातात असलेल्या पाण्यासोबत ती वाहून जातात. पिकास उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी स्फुरदयुक्त युरिया ब्रिकेट्स स्वरूपातील खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
प्लास्टिक खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
खेड : पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याचमुळे अत्यावश्यक सेवेतील दुकानांपाठोपाठ ताडपदरी व प्लास्टिक कापड दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. प्लास्टिक कापड खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. मात्र प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या सूचना सातत्याने देण्यात येत असून, या दुकान व्यावसायिकांवर करडी नजरही ठेवली आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक घरांची पडझड झाली. घराच्या छतावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसारही उघड्यावर पडले आहेत.
नागरिकांची तारांबळ
चिपळूण : शहरातील नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी येथील पोलीस यंत्रणा, नगर परिषद व महसूल प्रशासन दरदिवशी नवनवीन उपाययोजना राबवत आहे. सोमवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत शहरात येणारा चिपळूण-गुहागर मार्ग उक्ताड येथे पूर्णपणे बंद केल्याने वाहनधारकांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली. वाहनधारकांनी गुहागर बायपासमार्गे बाजारपेठेत प्रवेश केल्याने अंतर्गत रस्त्यांवर वाहनांनी मोठी गर्दी केली होती.
सुतारवाड पूल काम धिम्यागतीने
रामपूर : गुहागर - विजापूर राष्ट्रीय महामार्ग मनीषा कन्स्ट्रक्शनतर्फे काम सुरू असून, मार्गताम्हाने सुतारवाडी पूल पावसाळ्याच्या आत १० ते १२ दिवसांत तयार होणे कठीण दिसत आहे. सुतारवाडी नदीत भराव घालून रस्ता केला जात आहे. परंतु, ताैक्ते वादळ पावसात नदी असल्याने पाणी आले. चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रामपूर-मार्गताम्हाने प्रवास करणे कठीण जाणार आहे.