चिपळूण : गेल्या दहा दिवसांपासून लोटेमाळ येथे सुरू असलेल्या भगवान कोकरे महाराज यांच्या आमरण उपोषणाची अद्याप शासनस्तरावर दखल घेतलेली नाही. परिणामी त्यांची प्रकृती दिवसेदिंवस खालावत असून शनिवारी त्यांना रक्ताची उलटी झाली. त्यामुळे लोटे प्राथमिक केंद्रातील आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोन वेळा अहवाल सादर केला आहे. मात्र कोकरे यांनी उपचार करून घेण्यास नकार दिल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.
राज्यात गोशाळेतील गायींना शासनाने चारा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भगवान कोकरे महाराजांनी वर्षभरात तिनदा उपोषण केले. आता चौथ्यांदा त्यांच्यावर उपोषणाची वेळ आली. २२ फेब्रुवारीपासून गोशाळेतच त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. तेव्हापासून आजतायागत गोशाळेतील जनावरे देखील चारा पाण्यापासून वंचीत आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी गोशाळेतील ११०० गायी महामार्गाने कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभाग कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र पशुसंवर्धन विभागाच्या सहायक आयुक्तांनी गोशाळेचे थकित अनुदान मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्याशिवाय राज्यातील गोशाळांना अनुदान स्वरूपात निधी पुरवठा करण्याबाबत अधिवेशनात धोरणात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतू त्यावरही शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कोकरे महाराज आपल्या उपोषणावर ठाम आहेत.
याबाबत कोकरे महाराज म्हणाले, राज्यात दुष्काळाची भिषण परिस्थिती आहे. ज्या राज्यात मानसाच्या आरक्षणाची दखल घेतली जाते, किंवा त्यासाठी यंत्रणा काम करते. परंतू मुक्या जनांवराच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणालाही वेळ नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या सारखी माणसे नेतृत्व करत असताना गोशाळेला न्याय मिळत नसेल तर ते दुखद आहे. आता नाही तर मग यावर कधी निर्णय होणार, हा प्रश्न आहे. सरकारने केवळ आपल्या श्री. संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळेचाच विचार न करता राज्यभरातील गोशाळांचा विचार व्हावा. यासाठीच आपले हे उपोषण सुरू असून जोवर शासन आपल्या मागणीची दखल घेत नाही, मग गो मातेसाठी मरण आले तरी बेहत्तर, पण उपोषण थांबणार नाही, असा इशाराही कोकरे यांनी दिला आहे. यावेळी पोलदापूर येथील वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष चंद्रकांत घाडगे