लांजा : एका माथेफिरूने तीन ज्येष्ठांवर कुऱ्हाड व पहारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. १८) दुपारी ३:१५ वाजता पनाेरे-कवचेवाडी (ता. लांजा) येथे घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे, तर अन्य एकजण किरकाेळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर लांजा पाेलिसांनी माथेफिरूला ताब्यात घेतले आहे.जानू रघुनाथ कवचे (७०) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. तसेच सुरेश संभाजी कवचे (६०) हे गंभीर जखमी झाले असून, सुदेश गुणाजी कवचे (६०) हे जखमी झाले आहेत. दाेघांनाही रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पनाेरे गावातील कवचेवाडी येथील एक माथेफिरू हातात कुऱ्हाड आणि पहार घेऊन फिरत हाेता. त्याने आधी जानू कवचे यांच्या डाेक्यात पहारीने प्रहार केला. हा प्रहार इतका जबरदस्त हाेता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर त्या माथेफिरूने त्याच वाडीतील सुरेश कवचे यांच्या डाेक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात ते गंभीर जखमी हाेऊन जमिनीवर काेसळले. त्यानंतर त्याने सुदेश गुणाजी कवचे यांच्यावरही कुऱ्हाडीने घाव घालून जखमी केले. त्यानंतर हा माथेफिरू तिथून निघून गेला.
याबाबत लांजा पाेलिसांना माहिती देताच पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच गंभीर जखमी झालेल्या सुरेश कवचे आणि सुदेश कवचे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पाेलिसांनी त्या माथेफिरूचा शाेध घेऊन सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास लांजा पाेलिस करत आहेत.