कोरोनाशी लढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:38 AM2021-09-17T04:38:24+5:302021-09-17T04:38:24+5:30
२. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालय आता पूर्णपणे नॉन कोविड रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले आहे. गेले वर्षभर शासकीय रुग्णालय ...
२. रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालय आता पूर्णपणे नॉन कोविड रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले आहे. गेले वर्षभर शासकीय रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून सुरू होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने १ सप्टेंबरपासून नॉन कोविड म्हणून सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व रुग्ण आता महिला रुग्णालयातच दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व उपचार या रुग्णालयात करण्यात आले आहेत.
३. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमण वाढू नये, यासाठी उपाययोजना राबवाव्यात व कोणत्या सूचनांचे व्यापारी, ग्राहक व ग्रामस्थांनी पालन करावे, याबाबत नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र, या नियमावली व उपाययोजनांचा बट्ट्याबोळ उडाल्याचे दिसून येत आहे. शृंगारतळी हे मध्यवर्ती ठिकाण व तालुक्याची मोठी बाजारपेठ असल्याने येथे कोणत्याही स्थितीत गर्दी होऊ नये म्हणून नियमावली जाहीर करण्यात आली होती.