२. जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सर्वांत कमी आहे. या तालुक्यामध्ये मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचे दोन अंकी रुग्ण सापडलेले नाहीत. येथे आतापर्यंत केवळ १,१९३ रुग्ण सापडले असून १,१४७ रुग्ण बरे झाले आहेत, तर केवळ २९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. सध्या १७ रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यामुळे मंडणगड तालुका कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. आरोग्य यंत्रणेनेही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.
३. जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोनाने हाहाकार उडविला होता. त्यामुळे अजूनही लॉकडाऊन पूर्णपणे उठविण्यात आलेले नाही. आजच्या घडीला कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असला तरी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पाेलीस यंत्रणा आजही सतर्क आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यापारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेतच आपली दुकाने उघडी ठेवतात. तसेच मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे लोक मास्कशिवाय घराबाहेर पडत नाहीत.