आपण विविध खेळादरम्यानच्या दुखापती याबद्दल माहिती घेत आहोत. ६) शिन स्प्लीन्टस् म्हणजेच जबरदस्त दुखणं जाणवतं. ते पायाच्या पुढील बाजूस, गुडघ्याच्या खाली सहसा जलद धावण्याचे खेळ, उडी मारण्यासंबंधित खेळ यामध्ये पोटरी (CALF MUSCELES) वर जर योग्य ताण थोडक्यात बॅलन्सिंग किंवा समतोल ताण असला नाही तर ही दुखापत होते. सहसा कडक मैदानावर हा त्रास व्हायची शक्यता असते.
७) खेळा ‘SORE KNEE’ दरम्यानची गुडघेदुखी यालाच असे म्हणतात. गुडघ्याच्या चहुबाजूला खेळताना दुखते किंवा खेळून झाल्यावर दुखते. सहसा गुडघ्याच्या बाजूला, सभोवती जे स्रायू असतात. त्याच्या नियमित ताकद वाढविण्याच्या व्यायामाने हा त्रास होत नाही.
८) पोटरीचे दुखणे म्हणजेच ‘SORE ACHILLES TENDON’ सहसा खेळानंतर पोटऱ्या दुखणे हे सहज आहे. अतिरिक्त खेळ किंवा ताण हेच त्याला कारण आहे.
९) खोट दुखणे किंवा ‘PLANTER FASCITIS’ हेही असेच एक दुखणे आहे. यात पायाच्या घोट्यांसभोवताली दुखते. आर्चेस म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं तर पायाची ठेवण यात दुखतं. सहसा बऱ्याच वेळेपर्यंत आराम झाल्यावर उठून उभे राहताना जबरदस्त दुखण्याची कळ येते. हे होऊच नये त्यासाठी खेळादरम्यान योग्य कुशन असलेले बुट वापरणे आवाश्यक आहे.
आपण सध्या डोक्याला होणाऱ्या इजा याचा स्वतंत्रपणे लेखाजोखा मांडणार आहोत; पण हेल्मेटची सक्ती यामुळे व्हेईकल (कार, मोटार सायकल इत्यादी) रेसिंग किंवा क्रिकेट खेळताना बॅटिंग, विकेट किपर, हॉर्स रायडिंग, बॉक्सिंग इत्यादी खेळांमध्ये हेल्मेट घालणे आवश्यक आहे.
खेळादरम्यान खेळाडूचे स्रायू गट किंवा समूह दुखतात. वेदना होतात. यालाच स्रायूंची दुखणी किंवा ‘SORENESS’ असं म्हणतात. न्यू जर्सी येथील पॅसकॅक व्हॅली हॉस्पिटल’चे डॉ. अॅनल लेव्ही, एम. डी., डायरेक्टर ऑफ स्पोर्टस् मेडिसिन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, स्रायू कशी, कितपत इजा पोहोचली आहे. खेळातील त्यावेळेसची खेळाडूची स्थिती, त्याची झेप किंवा परिस्थिती (SITUATION) यावर तुमच्या आरामाची वेळ, स्रायू समूह पूर्ण दुखण्यातून बरा होण्याचा काळ यावर अवलंबून असते. अर्थात खेळाडू, त्यांचे कोच, त्यांची काळजी घेणारे डॉक्टर्स आणि फिजिओथेरपिस्ट यांना अनुभवातून कळते. ते संपूर्ण बरे होतात. पुन्हा खेळासाठी तयार होतात, उत्साहित होतात. अर्थात खेळाडूंचं अंत:स्थ प्रेरणेचं स्त्रोत इतकं जबरदस्त असतं की, ते या गोष्टींकडे त्यांचे लक्षही जात नाही. त्यांचा नियमित सराव, त्यांची ऊर्मी, त्यांचा उत्साह, त्यांची जिद्द आणि यश मिळविणारच याचा निश्चय त्यांना असे काही भारावून टाकतो, असं काही त्याचं स्पिरीट असतं, की त्यांचा मेंदू, स्रायू, सांधे, कृती, चाल, प्रतिक्षिप्त क्रिया सर्व काही खेळमय झालेलं असतं. म्हणूनच सर्वसामान्य जणांना कुठल्याही इजेतून, दुखण्यातून बरे होण्यास जो वेळ जातो, त्याच्या एक चतुर्थांश वेळेपेक्षाही कमी वेळ खेळाडूंना लागतो. कारण मेंदूत स्त्रवणारे कृतिशील सकारात्मक हार्मोन्स आणि सकारात्मक खेळण्याचे न्यूरो ट्रान्समीटर्स हे कृतिशील असतात.
- (क्रमश:)