शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

पारंपरिक कोळी बांधवांच्या उपोषणस्थळी माजी आमदार संजय कदम यांची भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 2:27 PM

fisherman Ratnagiri-समुद्रात बेकायदेशीररीत्या होणारी एलईडी मासेमारी, पर्ससीन नौका याविरोधात दापोली, मंडणगड व गुहागर येथील पारंपरिक कोळी बांधवांनी सुरू केलेले साखळी उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या उपोषणाला माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देपारंपरिक कोळी बांधवांच्या उपोषणस्थळी माजी आमदार संजय कदम यांची भेट  राष्ट्रवादी सदैव मच्छिमारांच्या पाठीशी :संजय कदम

दापोली : समुद्रात बेकायदेशीररीत्या होणारी एलईडी मासेमारी, पर्ससीन नौका याविरोधात दापोली, मंडणगड व गुहागर येथील पारंपरिक कोळी बांधवांनी सुरू केलेले साखळी उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होते. या उपोषणाला माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाठीशी असल्याचे सांगितले.पारंपरिक मच्छीमार समाजाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ८० ते ९० टक्के नौका बंदरामध्ये व खाड्यांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर मासेमारीला अभय देत शासनाकडून डोळेझाक होत असल्याने हायस्पीड व एलईडी मासेमारीच्या संख्येत वाढ होत आहे. त्याविरोधात दापोली मंडणगड- गुहागर मच्छीमार संघर्ष समितीकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.मंगळवारी माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक विश्वास मुधोळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व दापोली नगर पंचायत नगरसेवक खालीद रखांगे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड, मंडणगड तालुकाध्यक्ष महेश कचावडे, दापोली तालुका अध्यक्ष नितीन साठे, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष मयूर मोहिते, पालगड गण अध्यक्ष योगेश महाडिक, गव्हे ग्रामपंचायत सदस्य पप्या जोशी, उमेश साटले, गुहागर तालुकाध्यक्ष विनोद जानवलकर व पदाधिकाऱ्यांनी उपोषण करणाऱ्यांची भेट घेतली. जोपर्यंत ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कोळी बांधवांनी व्यक्त केला आहे.उध्दवसाहेब, आश्वासनाचे काय झालेउद्धव साहेब तुम्ही पंधरा दिवसांत एलईडी मासेमारीच्या बोटी अरबी समुद्रात बुडविणार होतात. आपण दिलेल्या वचनाला आता दोन वर्षं पूर्ण होतील, परंतु एलईडी मासेमारी अजूनही राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे आपण दिलेल्या वचनाचा आपल्याला विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न हर्णै बंदर कमिटीचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.लोकसभेप्रसंगी दिले होते वचनलोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे हे अनंत गिते यांच्या प्रचारासाठी गुहागर येथे आले होते. त्याच वेळेस जाहीर सभेत त्यांनी कोकणातील पारंपरिक मच्छीमारांना एलईडी मासेमारी पंधरा दिवसांत अरबी समुद्रात बुडवण्याचे वचन दिले होते. कोकणातील पारंपरिक मच्छीमार आजही शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे. तुमचा मावळा असलेला हा पारंपरिक मच्छीमार समाज संकटात सापडला आहे, त्यांना तुम्ही कधी मदत करणार, असा प्रश्नही पावसे यांनी केला.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी