रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. रामभक्तांच्या समर्पणातून मदत केली जाणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी येथील राम मंदिर आणि मारुती मंदिर येथून करण्यात आला. अवघ्या काही तासांत रत्नागिरीतून भरघोस निधी रामभक्तांनी जमा केला. १५ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान प्रत्येक गाव, शहरात राबवण्यात येणार आहे.श्रीराम मंदिर समर्पण निधी अभियानाची समितीने कामाला सुरुवात केली आहे. आजवगावकर वाडी येथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात या अभियानाचे कार्यालय सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता आरती करून आणि प्रभू श्रीरामाचा जयजयकार करून निधी समर्पणास प्रारंभ झाला. यावेळी मंगल पटवर्धन यांनी पहिला धनादेश देऊन प्रारंभ केला. त्यानंतर श्रीराम मंदिर देवस्थान, ब्रह्मरत्न रत्नागिरी या संस्थांसह रामभक्तांनी भरघोस निधी दिला.त्यानंतर मारुती मंदिर सर्कल येथील प्राचीन मारुती मंदिरमध्ये रामभक्तांनी आरती केली. यावेळीही शेकडो रामभक्त जमले होते. आरतीनंतर येथेही रामभक्तांनी धनादेश, रोख रक्कम राम मंदिर उभारणीसाठी दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीसमोर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि रामभक्तांनी महाराजांची आरती केली. महाराजांचा जयजयकार केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
मंदिर निधी समर्पणाच्या शुभारंभादिवशी जमला लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 1:05 PM
Ram Mandir Funds Ratnagiri- दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. रामभक्तांच्या समर्पणातून मदत केली जाणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी येथील राम मंदिर आणि मारुती मंदिर येथून करण्यात आला. अवघ्या काही तासांत रत्नागिरीतून भरघोस निधी रामभक्तांनी जमा केला. १५ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान प्रत्येक गाव, शहरात राबवण्यात येणार आहे.
ठळक मुद्देमंदिर निधी समर्पणाच्या शुभारंभादिवशी जमला लाखाचा निधी रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात आरती