मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे कॉलेज चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 12:23 PM2021-03-26T12:23:24+5:302021-03-26T12:27:53+5:30

gogte college Ratnagiri- ५३ वा मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२१ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय झोनल राऊंडमध्ये १० स्पर्धांपैकी ८ स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त करत चॅम्पियन ठरले आहे.

Gogte College Champion in Ratnagiri South Zone | मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे कॉलेज चॅम्पियन

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे कॉलेज चॅम्पियन

googlenewsNext
ठळक मुद्देरत्नागिरी दक्षिण झोनमध्ये गोगटे कॉलेज चॅम्पियनमुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात पारितोषिक

रत्नागिरी : ५३ वा मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव २०२१ मध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालय झोनल राऊंडमध्ये १० स्पर्धांपैकी ८ स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त करत चॅम्पियन ठरले आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त झालेली पारितोषिके प्रथम क्रमांक - शास्त्रीय गीतगायन स्पर्धा - वैष्णवी जोशी, सुगम संगीत- वैष्णवी जोशी, वेस्टर्न गीतगायन स्पर्धा- सम्यक हातखंबकर, मिमिक्री- शैलेश इंगळे, एकपात्री- शुभम गोविलकर. द्वितीय क्रमांक - वक्तृत्व स्पर्धा- सीमा दसाणा, तृतीय क्रमांक - ऑन स्पॉट पेंटिंग- ओमकार कांबळे, कथाकथन- पर्णिका तिवरेकर.

सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांच्या सोबत प्रा. शुभम पांचाळ, प्रा. मधुरा आठवले- दाते, प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. आरती पोटफोडे, प्रा.अजिंक्य पिलणकर तसेच विद्यार्थी सचिव बुशरा खान व सांस्कृतिक विभाग विद्यार्थी प्रतिनिधी प्रसाद साळवी शुभम शिवलकर, पर्णिका सुर्वे, कौस्तुभ आंब्रे, स्वप्नील शिंदे, सिद्धी गुरव यांनी व्यवस्थापन केले. तसेच सिद्धी शिंदे, शुभम नंदानी, चैतन्य पटवर्धन, केदार लिंगायत, स्वानंद नेने यांनी मेहनत घेतली.

इतर महाविद्यालयाचे पॉईंटस

  • गोगटे जोगळेकर कॉलेज- १८
  • आठल्ये सप्रे पित्रे कॉलेज- ११
  • आर्टस् कॉमर्स अँड ससान्स कॉलेज लांजा- ८
  • दि कॅड कॉलेज- ५
  • नवनिर्माण कॉलेज - ४
  • चाफे कॉलेज- ३
  • भारत शिक्षण मंडळ कॉलेज- ३
  • फिनोलेक्स कॉलेज- १
  • आबासाहेब मराठे कॉलेज- १

Web Title: Gogte College Champion in Ratnagiri South Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.