शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

गुढीपाडव्याचे नमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2021 4:33 AM

असतात. गावागावातून येणाऱ्या पालख्या, त्यांच्या ओटीसाठीची लगबग, ढोल-ताशांचा गजर, घंटानाद अक्षरशः वेड लावणारे आणि उत्साहाचे भरते आणणारे हे दिवस ...

असतात. गावागावातून येणाऱ्या पालख्या, त्यांच्या ओटीसाठीची लगबग, ढोल-ताशांचा गजर, घंटानाद अक्षरशः वेड लावणारे आणि उत्साहाचे भरते आणणारे हे दिवस संपूच नये वाटते. खेळ्यांचे मेळ भरपूर येतात; पण नमन दाखवणारे मोजकेच. ‘अरे, आज नमान हाय’ हे वाक्यच संध्याकाळची वाट पाहायला लावते. लहानपणी तर आम्ही चार पाच किलोमीटरवर नमन पाहायला जायचो; पण एखाद्या खेळ्यांचे पूर्ण नमन पाहायचे असेल तर गुढीपाडव्याला त्यांच्या मांडावर (खेळ बसण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण ) जायचे. खरं तर रावणाला पराभूत करून लंका जिंकणाऱ्या रामाच्या स्वागतासाठी गुढ्या उभारण्याची ही परंपरा. तळकोकणात याच दिवशी खेळ उतरला जातो. आमच्या हर्चे गावात पूर्वी बाहेरगावाहून खेळे आले की, त्यांचे बोचके (तीन दिवसाचे साहित्य) बाहेर मंडपाला लावलेले असे. ते झोपायलाही घरी नाहीत, उलट मांडावर जायचे. त्यातून

कोणी घरी येऊन झोपले तर रात्री अकरा-बाराच्या सुमारास ‘आयना की बायना.. घेतल्याशिवाय जायना’ म्हणत दारात येणारी टोळी खेळगड्याला सोबत घेऊनच रवाना होई. त्यामुळे घरी झोपायचे धाडसच कोणी करेना. हा खेळ गुढीपाडवा झाला की समाप्त होई. आजही आमच्याकडे गुढीपाडव्यादिवशी सकाळीच गावकरांच्या घरी असलेली सोंगे मांडावर आणतात. त्यात राम-लक्ष्मण, वाघ, हरिण यांचे मुखवटे, रावणाची वजनदार फळी, बंडबाहुली,

नटवे आदी साहित्य आणले जाते. इतर दिवशी बरेच खेळे गण, गवळण, वगनाट्य दाखवून नमन संपवतात; पण गुढीपाडव्याला सर्व जुन्या चालीरीती पाहायला मिळतात. आमच्याकडे यादिवशी बरेचदा रात्री बारानंतरच नमन चालू होते ते पहाटेपर्यंत चालते. गण, गवळण, वगनाट्य, याबरोबरच फार्स, अंगोडी सोंगे, हरिण, वाघ, नटवे, बंडबाहुली आणि शेवटी राम-रावण युद्ध. शेवटी सर्व

नमनकरी ‘हिंद भू आमची सेना शिवाजी, राणा मराठ्यांचा बाणा....’ गीत गात गावातील देवतांचा जयजयकार करतात. यानंतर नमनाची सांगता होते. मात्र पाडव्याच्या

दिवशी हरिण म्हणून गेल्यानंतर मागून इतरांनी टाळ्यांनी झोडपलेले, वाघाच्या अंगाखांद्यावर उड्या मारलेले, राम-लक्ष्मण यांना तलवारी घेत खेळवत आणलेले, रावणाला प्रेक्षकांतून आणताना उडालेला हाहाकार, रावणाची जड फळी नाचवून अंगावर आलेला रावण, नारळ फिरवून उतरण्यासाठीची धडपड, राम-लक्ष्मण आपणच नाचवायचे म्हणून आमच्या बंधूंनी लपवून ठेवलेले मुखवटे, काळोखात लाल रंग समजून रावणाला फासलेले तिखट, नमनाला फार उशीर झाल्याने ऐन इंट्रीच्या वेळी झोपलेला सेंदूरदैत्य, गायरीत (शेणकाई) पडलेली पुतनामावशी, वाघ नाचवणारे

बुवा, बंडबावली स्पेशालिस्ट नाऱ्या नाना, कितीही टाइट असले तरी लयीत टाळ वाजवणारे निवळकर (टोपणनावाने महाराज म्हूणन ते अधिक प्रसिद्ध होते.) ही सारी मंडळी, हास्याचे क्षण पाडव्याच्या नमनाला आवर्जून स्मरतात. नमनाच्या अखेरीस चुडी (एकत्र बांधलेल्या गवताच छोट्या पेंढ्या) पेटवून खेळ खेळला जातो आणि शिमगोत्सवाची सांगता होते. बऱ्याचदा पहाटे नमन आवरून शेजारी भडे गावात जायची आमची इच्छा असे. पाडव्याला तिकडे नमनाची सांगता रसान्यात उड्या मारून होते. आजही तेथे

साधारण २० बाय २० फुटांच्या चौरसात किमान अडीच फूट रसाना (लाकडे जाळून निखाऱ्याचा ढीग) केला जातो. नमनाच्या शेवटी गावकरी आणि मानकरी तसेच समस्त खेळगडी ‘लागेलो, लागेलो’ च्या जयघोषात बिनधास्तपणे

रसान्यात उड्या घेत शिमगोत्सवाची सांगता करतात. दोन्ही गावांतील पाडव्याचे नमन पाहता शिवाजी महाराजांचे वंशज अनेक पिढ्यांपासून धगधगत्या आगीशी खेळ करून निडरपणे जगण्यास समर्थ असल्याचेच द्योतक वाटतात.

पूर्वापार चालत आलेल्या या रूढी-परंपरांना नव्या पिढीचा बाज मिळाला, हे जरी खरे असले तरीही पाडव्याच्या नमनात पारंपरिकतेची रेलचेल आजही पाहावयास मिळते जी चिरस्मरणीय ठरते.

- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा