गुरुनिष्ठा ठेवत नम्रपणे ज्ञानकण वेचून घ्या : निशादेवी वाघमोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:29 AM2021-03-24T04:29:20+5:302021-03-24T04:29:20+5:30
फोटो कॅप्शन : हातखंबा विद्यालयातील कार्यक्रमात माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांचा माई देसाई यांनी सत्कार केला. यावेळी केंद्रप्रमुख डॉ. ...
फोटो कॅप्शन : हातखंबा विद्यालयातील कार्यक्रमात माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांचा माई देसाई यांनी सत्कार केला. यावेळी केंद्रप्रमुख डॉ. अस्मिता मजगावकर उपस्थित हाेते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
हातखंबा : ज्ञान अफाट आहे, ज्ञानानेच मनुष्य सुसंस्कृत व संस्कारक्षम होतो म्हणून विद्येच्या ज्ञानरूपी सागरात विद्यार्थ्यांनी ज्ञानकण वेचून घेऊन गुरुनिष्ठा ठेवत नम्रतेच्या माध्यमातून आपले जीवन सजग आणि कौतुकास्पद करण्याचा प्रयत्न करा. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती गगनालाही गवसणी घालता येते हे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे, असा संदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी निशोदवी वाघमोडे यांनी हातखंबा येथील गुरुवर्य अ. आ. देसाई विद्यालय व मापुस्कर ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग, केंद्रप्रमुख डॉ. अस्मिता मजगावकर, आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा माई देसाई, महिला दक्षता समितीच्या अंजली शिंदे, सरिता मापुस्कर उपस्थित होते. हातखंबा, झरेवाडी, पानवळ, भोके, चरवेली येथील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रभावी मातांचा, कोविड योद्धा म्हणून कार्य केलेल्या आशासेविका व अंगणवाडी सेविका तसेच नवनिर्वाचित महिला सरपंच व महिला ग्रामपंचायत सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक हुसेन पठाण यांनी केले. ऐश्वर्या जठार, सायली पवार, विद्या बोंबले, अशिता मापुस्कर, अंजली शिंदे, पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, माई देसाई, केंद्रप्रमुख डॉ. अस्मिता मजगावकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक भीमसिंग गावित, स्नेहा सागवेकर यांनी केले, तर प्रा. अनिता पाटील यांनी आभार मानले.