शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : जतमध्ये फडणवीसांच्या शिलेदाराने गड खेचून आणला; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय
3
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
4
"हा महायुतीच्या एकजुटीचा विजय, जनतेसमोर नतमस्तक", देेवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
5
Mahim Vidhan Sabha Election Result 2024 Live : "एक धनवान अन् एक राजपुत्र, त्यांच्या..."; विजयानंतर महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडून दाखवला"; एकहाती विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
7
अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील दिग्गजांना पराभवाचा धक्का! थोरात, गडाख, तनपुरे, भांगरे पराभूत
8
Sangamner Vidhan Sabha Election Result 2024 Live : बाळासाहेब थोरातांना पराभवाचा धक्का; नवखे अमोल खताळ ठरले जायंट किलर
9
Anushakti Nagar Vidhan Sabha Result 2024: स्वरा भास्करचा पती फहाद अहमद विरुद्ध सना मलिक, निकाल काय?
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
11
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
13
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
14
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
15
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
16
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
17
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
18
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'अजित पवार पिछाडीवर', अशी खोटी बातमी का दाखवता? अजित पवारांचा सवाल

गुटख्याचे ‘कर्नाटक कनेक्शन’ तुटता तुटेना!, विक्री राजरोसपणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 2:01 PM

केवळ पानपट्टी व टपरी व्यावसायिक नव्हे, तर बाजारपेठेतील काही व्यापारीही यात गुंतले असल्याने हे जाळे आणखी घट्ट होऊ लागले

चिपळूण : गेल्या काही महिन्यांपासून गुटखा विक्री राजरोसपणे सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. यामध्ये आता केवळ पानपट्टी व टपरी व्यावसायिक नव्हे, तर बाजारपेठेतील काही व्यापारीही गुंतले असल्याने हे जाळे आणखी घट्ट होऊ लागले आहे. त्याचे थेट कनेक्शन कर्नाटकपर्यंत असल्याचे बोलले जात असले, तरी या प्रकरणी तपास करणारी यंत्रणा अत्यंत कुचकामी ठरली आहे.दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील कामथे व त्यानंतर कालुस्ते येथे गुटख्याचा छोटा कारखानाच आढळला होता. त्याचवेळी गुटख्याचा पुरवठा भंगार व्यावसायिकांमार्फत केला जात असल्याचे उघड झाले होते. पानपट्टी, टपरी व अन्य फेरीवाल्यांमार्फत त्याचे वितरण केले जात होते. मात्र आता या व्यवसायात काही व्यापारी उतरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बाजारपेठेतील घाऊक विक्रेत्यांना हेरून त्यांच्याकडे नेहमी खरेदी करणाऱ्या छोट्या व ग्रामीण भागातील व्यावसायिकांना या जाळ्यात ओढले जात आहे. त्यातून नवी साखळी तयार झाली आहे. विशेषतः मुख्य बाजारपेठेसह आजूबाजूच्या छोट्या बाजारपेठेतही हे जाळे निर्माण झाले आहे. गतवर्षी चिपळूण शहरापासून काही अंतरावर असलेल्या अलोरे येथील कविता स्टॉलवर अलोरे शिरगाव पोलिसांनी छापा टाकून ३८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. त्याचवेळी सावर्डे बाजारपेठेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी एका जनरल स्टोअर्सच्या दुकानावर धाड टाकून ७५ हजार किमतीचा गुटखा व प्रतिबंधित केलेले पदार्थ जप्त केले. या प्रकरणी अमोल अशोक कोकाटे याला अटक करण्यात आली होती.गुटखा प्रकरणात आतापर्यंत झालेल्या कारवाईत ठराविक व्यक्तींची नावे पुन्हा पुन्हा पुढे येत आहेत. मुश्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी (चिपळूण) याच्याविरुद्ध सलग तीन वेळा गुन्हा दाखल झाला आहे. याच पद्धतीने गुटखा प्रकरणात काही व्यक्तींची नावे पुन्हा पुन्हा पुढे येत आहेत. तरीदेखील पोलीस यंत्रणा मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहचू शकलेली नाही. मागील एका प्रकरणात बेळगाव येथील मुख्य वितरकापर्यंत पोलीस पोहचले होते. परंतु त्यानंतरची कारवाई पूर्णतः थंडावली.मुळात गुटख्याचे वितरणच कर्नाटकमधून होत असल्याचे याआधीही पोलिसांनी स्पष्ट केले होते. कर्नाटकमध्ये गुटख्याला बंदी नसल्याने त्याचा या व्यावसायिकांनी फायदा उठवला आहे. परंतु या प्रकरणातील संबंधित आरोपी हे सांघिक गुन्हेगारीत असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करता येत नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले होते. परंतु आता गुटखा विक्रीचे जाळे आणखी घट्ट झाल्याने व त्यात युवक व तरुण मुलं व्यसनाधीन झाल्याने पालक वर्ग चिंताग्रस्त बनला आहे.

मुख्य सूत्रधार मोकाटचदहा दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई आणि रत्नागिरीच्या संयुक्त पथकाने येथील बाजारपेठेत धाड टाकली होती. या धाडीत दोन व्यापाऱ्यांकडून तब्बल साडेचार लाखाचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना अंतरिम जामीनही मंजूर झाला आहे. परंतु हे चौघेजण अद्यापही मोकाट आहेत. तसेच दहा दिवसांनंतरही या प्रकरणातील मुख्य सूत्रधारही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

गुटखा प्रकरणातील चार जणांवर गुन्हा दाखल असला, तरी अद्याप त्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी झालेली चौकशी व तपासाची माहिती देता येत नाही. अजून या प्रकरणी तपास व चौकशी सुरू आहे. - रत्नदीप साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी