नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूण पूरग्रस्त भागात मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:26 AM2021-07-25T04:26:12+5:302021-07-25T04:26:12+5:30

रत्नागिरी : चिपळूण व परिसरात पूरस्थितीमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त झाले असून, घराघराला त्याची झळ बसली आहे. अशा संकटाच्या काळात ...

Helping hand in Chiplun flood affected area by Narendracharya Maharaj Sansthan | नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूण पूरग्रस्त भागात मदतीचा हात

नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे चिपळूण पूरग्रस्त भागात मदतीचा हात

Next

रत्नागिरी : चिपळूण व परिसरात पूरस्थितीमुळे अनेक संसार उद्‌ध्वस्त झाले असून, घराघराला त्याची झळ बसली आहे. अशा संकटाच्या काळात श्रीक्षेत्र नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे प्रशासनाने सुचवलेल्या भागात अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. संस्थानचे सुमारे ५० कार्यकर्ते व रुग्णवाहिका या सेवेत सहभागी झाल्या आहेत. येथील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे काम सुरू राहणार आहे.

ज्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते, तिथे प्रशासनाच्या निर्देशानुसार घरोघरी जाऊन खिचडीची पाकिटे वाटण्यात आली. चिपळूणचे तहसीलदार डॉ. जयराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अन्नदान करण्यात आले. पुरात अडकलेल्या काही लोकांची येथील सती हायस्कूलमध्ये निवाऱ्याची सोय केली आहे. तिथेही ही अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. तसेच सती नाका, पिंपळी समर्थनगर येथेही पाकिटे वाटली. रात्री उशिरापर्यंत असे वाटप करण्यात आले. संस्थानतर्फे सावर्डे येथे अन्न व पाकिटे तयार करण्यात आली. पूरग्रस्त भागात सुमारे ४०० अन्नाची पाकिटे वाटण्यात आली.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे ५० कार्यकर्ते व रुग्णवाहिका या सेवेत कार्यरत आहेत. अविनाश जागुष्टे, सुनील वीर, राजन बोडेकर, सुनील मोहिले, दिलीप मोहिरे, संतोष बिजीतकर, सिद्धेश रहाटे, आशिष शिवगण, प्रथमेश मोहिरे आदी या मदतकार्यात सहभागी झाले होते. या विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी व पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते.

------------------

आज स्वच्छता माेहीम

चिपळूण परिसरातील पुराचे पाणी ओसरले असले, तरी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. घरात, दुकानात, रस्त्यावर चिखलच चिखल पसरलेला आहे. हा चिखल वेळीच साफ करणे गरजेचे असल्याने जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे कार्यकर्ते रविवारी चिपळूणमध्ये दाखल हाेणार आहेत. याठिकाणी चिखल साफ करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या मदतकार्यात सुमारे एक हजार कार्यकर्ते सहभागी हाेणार आहेत.

--------------------------------

चिपळूण येथे शुक्रवारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या कार्यकर्त्यांतर्फे अन्नाची पाकिटे वाटण्यात आली.

Web Title: Helping hand in Chiplun flood affected area by Narendracharya Maharaj Sansthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.