संत निरंकारी मिशनतर्फे कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:28 AM2021-04-26T04:28:00+5:302021-04-26T04:28:00+5:30
चिपळूण : सदगुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनतर्फे कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात देण्यात येत आहे. ...
चिपळूण : सदगुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनतर्फे कोरोना रुग्णांसाठी मदतीचा हात देण्यात येत आहे. यातूनच दिल्ली येथे सत्संग भवनमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी अद्ययावत रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. त्यात १००० पेक्षा जादा बेडची सोय आहे.
दिल्ली सरकारच्या मदतीने या ठिकाणी रुग्णांच्या जेवणखाण्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे. दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत या सुविधांची पाहणी केली. देशभरातील सर्व सत्संग भवन कोविड लसीकरण केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याबाबतही मिशनतर्फे केंद्र सरकारला प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली असून, मिशनच्या देशभरातील शेकडो सत्संग भवनातून आता कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. पीपीई किट्स, मास्क, सॅनिटायझर इत्यादींचा पुरवठाही वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती क्षेत्रीय प्रबंधक गंगाधर विचारे यांनी दिली.