रत्नागिरीत ९ एप्रिल'ला निघणार हिंदू नववर्ष स्वागतयात्रा

By मेहरून नाकाडे | Published: March 19, 2024 05:36 PM2024-03-19T17:36:46+5:302024-03-19T17:36:58+5:30

गेल्या १९ वर्षांपासून शहरात गुढीपाडवा स्वागतयात्रा काढण्यात येते

Hindu New Year Swagat Yatra to start in Ratnagiri city | रत्नागिरीत ९ एप्रिल'ला निघणार हिंदू नववर्ष स्वागतयात्रा

रत्नागिरीत ९ एप्रिल'ला निघणार हिंदू नववर्ष स्वागतयात्रा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा यावर्षीही ९ एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. स्वागत यात्रेसाठी भैरी मंदिर ते पतितपावन मंदिर हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. यासंबंधीची पहिली बैठक रविवारी पतितपावन मंदिरात झाली. यावेळी देवस्थान समिती, विविध ज्ञाती संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यंदा प्रथमच व्यवस्थापन समिती तयार करण्यात येणार आहे. गेल्या १९ वर्षांपासून शहरात गुढीपाडवा स्वागतयात्रा काढण्यात येत आहे.

सभेच्या सुरूवातीला हिंदू समाजातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हिंदू गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत हिंदू धर्मातील सर्व पंथातील मंडळी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहे. १३० मंदिर संस्था, ज्ञाती संस्था, नवरात्रोत्सव मंडळांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. यावर्षी अधिकाधिक ज्ञातीसंस्था, आबालवृद्धांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील बैठक दि.३१ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता पतितपावन मंदिरात होणार आहे. तसेच दि.७ एप्रिल रोजी सायंकाळी दुचाकी फेरी काढण्यात येणार आहे. स्वागतयात्रेत रत्नागिरी शहरासह कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, भाट्ये, फणसोप, मिऱ्या, शिरगाव, कर्ला, जुवे, आंबेशेत अशा जवळच्या विविध गावांतील हिंदू बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत.

श्री भैरी मंदिरात गुढी उभी केल्यानंतर सकाळी ९ वाजता स्वागयात्रेला सुरूवात होणार आहे. त्याचवेळी मारुती मंदिर येथून वरील भागातील रथांची स्वागतयात्रा निघणार आहे. त्यानंतर जयस्तंभ येथे दोन्ही यात्रांचे एकत्रीकरण होणार असून तिथून पुढे पतितपावन मंदिरात यात्रा पोहोचणार आहे. झाडगाव येथील भैरी मंदिर येथून प्रारंभ झाल्यानंतर स्वागतयात्रा, कॉंग्रेसभवन, गोखले नाकामार्गे जयस्तंभ येथे येईल. येथे ही यात्रा आणि मारुती मंदिरपासून निघालेली स्वागतयात्रा एकत्र होऊन राम आळी मार्गे, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिरात पोहोचणार आहे. या मंदिरात हिंदु धर्माची शपथ घेऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.

Web Title: Hindu New Year Swagat Yatra to start in Ratnagiri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.