२. शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण उपचाराखाली आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेण्याची सवलत असतानाही अनेकजण खासगी रुग्णालयात जातात. त्या रुग्णांचा गैरफायदा घेतला जात असून, रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट केली जात आहे. चार-पाच दिवसांचे रुग्णाचे बिल लाखभर रुपये करण्यात येत आहे.
३. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि प्रशासन दिवस-रात्र काम करत आहेत. मात्र, त्याकडे काही लोक दुर्लक्ष करुन प्रशासनाला नाहक वेठीला धरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे प्रशासन कोरोनाशी झुंज देत असतानाच दुसरीकडे लोक बिनधास्तपणे दुचाकी, चारचाकी वाहनांतून रस्त्यांवर फिरताना दिसतात. त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे.