हुस्नबानू खलिफे यांनी राजापूर विधानसभा संघाचे नेतृत्व करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:15+5:302021-08-13T04:35:15+5:30

राजापूर : माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांना काॅंग्रेस पक्षाने विधानपरिषदेत संधी दिली. या सहा वर्षांच्या काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांचा ...

Husnbanu Khalifa should lead the Rajapur Assembly | हुस्नबानू खलिफे यांनी राजापूर विधानसभा संघाचे नेतृत्व करावे

हुस्नबानू खलिफे यांनी राजापूर विधानसभा संघाचे नेतृत्व करावे

googlenewsNext

राजापूर : माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांना काॅंग्रेस पक्षाने विधानपरिषदेत संधी दिली. या सहा वर्षांच्या काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा मतदार संघासाठी आणला. त्यामुळे आगामी २०२४च्या निवडणुकीत खलिफे यांनी विधानसभेचे नेतृत्व करावे, अशी मागणी राजापूर तालुका काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली. तसा ठरावही करण्यात आला.

राजापूर तालुका काॅंग्रेस कमिटीची बैठक येथील काॅंग्रेस कार्यालयात पार पडली. या बैठकीत ही मागणी करण्यात आली. या बैठकीला हुस्नबानू खलिफे, काॅंग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, नगरसेविका स्नेहा कुवेस्कर, नगरसेवक सुलतान ठाकूर, शहराध्यक्ष नवनाथ बिर्जे, जिल्हा सरचिटणीस किशोर नारकर, राजापूर नगर वाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावलकर, राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद चव्हाण, पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्ष स्नेहा कोलते, नगरसेवक आसिफ मुजावर, जितेंद्र खामकर, विलास कोलते, वैभव कुवेसकर, हरिदास चव्हाण, जलाल प्रभुलकर, संतोष कुळ्ये, विनायक सक्रे, नगरसेवक हनीफ युसूफ काझी, नूरमहंमद इस्माईल मुजावर, सुरेश मोरे, शरफुद्दीन काझी, दाजी चव्हाण, गुरुनाथ विश्वासराव, गणेश मोरे, मनोहर कांबळी, कुवेशी सरपंच मोनिका कांबळी, नगरसेविका परवीन बारगीर, दिलीप फोडकर, सिद्धेश मराठे उपस्थित होते.

Web Title: Husnbanu Khalifa should lead the Rajapur Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.