लांजात पाच दिवसानंतर काेराेना रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:21 AM2021-07-11T04:21:53+5:302021-07-11T04:21:53+5:30

लांजा : सलग पाच दिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली असताना शुक्रवारी तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने चिंता ...

Increase in carina patients after five days in Lanza | लांजात पाच दिवसानंतर काेराेना रुग्णांमध्ये वाढ

लांजात पाच दिवसानंतर काेराेना रुग्णांमध्ये वाढ

Next

लांजा : सलग पाच दिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली असताना शुक्रवारी तालुक्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी एका दिवसामध्ये तब्बल ६५ जण पाॅझिटिव्ह आढळले. तालुक्यात सध्या काेराेनाचे एकूण ३,४७८ रुग्ण झाले असून, ३,१५२ जणांनी काेराेनावर मात केली आहे.

आराेग्य विभागाकडून करण्यात आलेल्या अँटिजन चाचणीत १२, आरटीपीसीआरचे ४९ तसेच शहरात फिरणाऱ्या नागरिकांपैकी ४ असे एकूण ६५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये हर्दखळे तेलीवाडी २, प्रभानवल्ली ७, लांजा नाईकवाडी १, लांजा वैभव वसाहत ५, गवाणे करंबेळेवाडी १, लांजा नाभिकवाडी २, कोलेवाडी ५, पालू गाडेवाडी १, कणगवली शिंदेवाडी १७, खेरवसे गुरववाडी ४, शिपोशी बाईंगवाडी १, लांजा तेलीवाडी ३, आसगे शिंदेवाडी ५, लांजा माऊली नगर १, धुंदरे १, झापडे - कांटे २, देवधे खालची सावंतवाडी २, लांजा १ यांचा समावेश आहे. तालुक्यात सध्या २११ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Increase in carina patients after five days in Lanza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.