सार्वजनिक बांधकाम खात्याचे दिशादर्शक फलकावरील माहिती फसवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:33 AM2021-04-09T04:33:22+5:302021-04-09T04:33:22+5:30

०८आरटीएन०३.जेपीजी फोटो - सार्वजनिक बांधकाम खात्याने मंडणगडात लावलेल्या फलकावर चुकीची नावे छापण्यात आली आहेत. लाेकमत न्यूज नेटवर्क मंडणगड : ...

Information on Public Works Department signage is fraudulent | सार्वजनिक बांधकाम खात्याचे दिशादर्शक फलकावरील माहिती फसवी

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दिशादर्शक फलकावरील माहिती फसवी

Next

०८आरटीएन०३.जेपीजी

फोटो - सार्वजनिक बांधकाम खात्याने मंडणगडात लावलेल्या फलकावर चुकीची नावे छापण्यात आली आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क

मंडणगड : वाहतुकीला उपयुक्त ठरतील व प्रवाशांना गावांसह अंतराची अचूक माहिती देणाऱ्या फलक नूतनीकरणाची मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याने घाईघाईत राबवल्याची बाब निदर्शनास आली आहे. या मोहिमेत अनेक ठिकाणी नव्याने फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर मराठी व्याकरणाचा अजिबात विचार करण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणी गावांची नावे, अंतराची माहिती चुकीची टाकण्यात आली.

दिशादर्शक फलकांवरील चुकांमुळे प्रत्यक्ष वास्तवदर्शी स्थितीच समजत नसल्याने फलकांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्याची मोठी अडचण होते. बांधकाम विभागाचे अधिकारी हे अतिशय उच्च दर्जाचे मराठी भाषा व तांत्रिक माहितीत माहीर असतानाही मराठी व्याकरणावर अत्याचार करणारे लेखन प्रसिध्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झालेली आहे. भाषेतील गंभीर दोषांच्या कार्यपध्दतीमुळे बांधकाम विभागाची कार्यपध्दती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

Web Title: Information on Public Works Department signage is fraudulent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.