चिपळूण : खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्रीएम पेपर मिलमधील टाकाऊ मालाला लागलेल्या आगप्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन येथील तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्याकडे दिले.
खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये थ्रीएम पेपर मिल कार्यरत आहे. या कंपनीच्या परिसरातील टाकाऊ मालाला रविवारी दुपारी अचानकपणे आग लागली. या आगीने भीषण रौद्र रूप धारण केले होते की, ही आग भडकतच होती. आग नियंत्रणात येत नव्हती. यावरून या कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात टाकाऊ माल साठवून ठेवला होता. तसेच या आगीच्या धुराचे लोळ परिसरातील गावागावांतून दिसत होते. आगीचे प्रमाण वाढूनही कंपनी बंद करण्यात आली नव्हती. यावरून कंपनी व्यवस्थापनाला कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी नाही, असे घटनेवळी दिसून आले.
..........................
फोटो - खेर्डीतील आगप्रकरणी चौकशीच्या मागणीचे निवेदन तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना देण्यात आले.