असुर्डे : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छता श्रमदान अभियानाची सुरुवात कोकरे ग्रामपंचायत व शाळा यांच्यावतीने करण्यात आली. कोकरे नं. १ शाळा येथे शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला.
जोरदार पाऊस असतानाही त्याची पर्वा न करता या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याआधी कोकरे ग्रामपंचायतीच्यावतीने छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कोकरेचे उपसरपंच रोहित जाधव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक स्वच्छतेला प्राधान्य देऊन प्रत्येक घटकाला सहभागी करून या आणि त्यातून कोकरे हे स्वच्छतेचे आदर्श गाव बनवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करू या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी आर. एम. पाटील यांनीही मार्गदर्शन केले. मराठी शाळाचे शिक्षक सुनील चव्हाण, सुशील मोहिते, कोकरे हायस्कूलचे शिक्षक शांताराम घडशी यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कोकरेच्या सरपंच विनया दळवी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक सर्जेराव मांगले, सर्व शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वर्कर सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली साळुंखे यांनी केले.
200921\img_20210920_123110.jpg
कोकरे येथे स्वच्छता अभियानात सहभागी झालेले ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अंगणवाडी सेविका, व अन्य कर्मचारी