एलईडीने मासेमारी, गुहागरमधील नौकेविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:18 AM2021-03-30T04:18:30+5:302021-03-30T04:18:30+5:30

रत्नागिरी : एलईडीद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना एलईडी लावून मासेमारी करणाऱ्या गुहागर येथील नौकेसह मालकावर मत्स्य विभागाने ...

LED fishing, action against boats in Guhagar | एलईडीने मासेमारी, गुहागरमधील नौकेविरोधात कारवाई

एलईडीने मासेमारी, गुहागरमधील नौकेविरोधात कारवाई

Next

रत्नागिरी : एलईडीद्वारे मासेमारी करण्यास बंदी असताना एलईडी लावून मासेमारी करणाऱ्या गुहागर येथील नौकेसह मालकावर मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. कारवाई करताना नौकेवरील एलईडी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मत्स्य विभागाच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली. नौकेवर एलईडी बसवून मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंत्री अस्लम शेख हे रत्नागिरी जिल्हा दाैऱ्यावर असताना त्यांनी नुकतेच कारवाईचे आदेश देखील दिले होते. त्यानुसार मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी स्मितल कांबळे, सुरक्षारक्षक परिमल परशुराम मळेकर, सर्वेश प्रभाकर आडविरकर यांनी ही कारवाई केली. गुहागर तालुक्यातील साखरीआगार येथील नीलेश दगडू पाटील यांच्या कृपा आई स्वामी या नौकेवर एलईडीचे साहित्य आढळून आले. या प्रकरणी या नौकेच्या मालकावर म. सा. मा. नि. अधि. १९८१ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. नौकेवरील एलईडी लाईट्सचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Web Title: LED fishing, action against boats in Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.