जेएनयु प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:21 PM2020-01-08T17:21:03+5:302020-01-08T17:23:12+5:30

दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.

 Left terrorist face: Madhav Bhandari | जेएनयु प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी

जेएनयु प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी

Next
ठळक मुद्दे डाव्यांचा दहशतवादी चेहरा समोर : माधव भंडारी दिल्लीतील विद्यार्थी मारहाणप्रकरणी जोरदार टीका

दापोली : दिल्ली येथील जेएनयु विद्यार्थी मारहाण प्रकरणामुळे डाव्यांचा दहशतवादी चेहरासमोर आला असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे. डाव्यांनीच हे दहशतवादी कृत्य केले आहे, या प्रकरणाशी भाजपचा कोणताही हात नाही, असे विधान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

दापोलीत राष्ट्रप्रेमी संघटनेच्यावतीने नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी माधव भंडारी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी दिल्लीतील मारहाणीप्रकरणी भूमिका मांडली.

दिल्ली येथील जेएनयु प्रकरणात भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा कोणताही हात नसून, यामागे डाव्या पक्षांचा हात आहे. प्रकरणातून डाव्या विद्यार्थी संघटनांनी दहशतवादी कृत्य केले आहे, डाव्या संघटनांना देशामध्ये दहशत आणि रक्तपात घडवून आणायचं आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे दहशतवादी कृत्य देशातील विविध भागात केले जात आहे. डाव्या संघटनांचा हा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे, या कृत्याचे आपण समर्थन करणार नाही, केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असे त्यांनी सांगितले.

जेएनयु प्रकरणात हस्तक्षेप केला असता तर विरोधकांनी आमच्यावर टीका केली असती, आता या प्रकरणात अनेक विद्यार्थ्यांना मारहाण झाली असून, बुरखाधारी लोकांनी मारहाण केली आहे. त्यामुळे हल्लेखोर कोण होते हे कळू शकले नसले नाही. परंतु लवकरच त्यांचा चेहरा समोर येईल व त्यांना कठोर शासन होईल, असेही माधव भंडारी म्हणाले.

नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशात सर्वत्र विरोध होत असताना भाजपकडून नागरिकत्व सुधारणा कायदा कसा योग्य आहे, याबद्दल ठिकाणी सभा घेऊन जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. माधव भंडारी यांनी सीएए, एनआरसी यावर प्रबोधन केले. माधव भंडारी यांच्या जाहीर सभेला दापोली तालुक्यातील सर्वच जाती, धर्मातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

शंकांचे निरसन नाहीच

एनआरसी व एसएससी कायदा काय आहे, याचे फायदे काय आहेत, याबद्दल माधव भंडारी यांनी लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम बांधवांनी सीएए व एनआरसी याबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या. मात्र, त्यांच्या शंकांचे निरसन करता आले नाही.
 

Web Title:  Left terrorist face: Madhav Bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.