खेंड बावशेवाडीतील दारूधंद्यावर बंदी आणावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:46+5:302021-08-13T04:36:46+5:30
चिपळूण पोलिसांना उत्कर्ष महिला मंडळाचे निवेदन लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : शहरातील खेंड बावशेवाडी येथे गेली अनेक वर्षे गावठी ...
चिपळूण पोलिसांना उत्कर्ष महिला मंडळाचे निवेदन
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील खेंड बावशेवाडी येथे गेली अनेक वर्षे गावठी दारू विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. या व्यवसायामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, तर अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे हा व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी येथील उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्ष निर्मला कांबळे यांनी केली आहे.
शहरानजीक खेंड बावशेवाडी येथील सुनील तुळशीराम कांबळे यांच्या घरी गावठी दारू विक्रीचा व्यवसाय गेली अनेक वर्षे जोमाने सुरू आहे. गावातील तसेच परिसरातील अनेक तरुण या ठिकाणी दारू पिण्यासाठी येत आहेत व व्यसनाच्या आहारी पडत आहेत. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या व्यसनापायी दोन-तीन तरुणांचा मृत्यूही झाला आहे. हा दारू व्यवसाय बंद करण्यासाठी महिला मंडळाच्या सभासदांनी वेळोवेळी सुनील कांबळे यांना समज देऊनही ते हा व्यवसाय बंद करत नाहीत. उलट समज देणाऱ्या महिलांना ते धमकावण्याची भाषा करीत आहेत. उत्कर्ष महिला मंडळाच्या सदस्यांनी पोलिसांनाही याबाबतचे निवेदन दिले आहे. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष निर्मला कांबळे, सीताराम जाधव, सुभाष कांबळे, रमेश गमरे, शशिकांत कांबळे, विजय कांबळे, अरुण कांबळे, मुरंजन कांबळे, प्रकाश कांबळे, विजय मोहिते उपस्थित होते.